IMPIMP

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis statement on two thousand note and he gave answer to critics

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – आरबीआयने (RBI) शुक्रवारी अचानक दोन हजार रुपयांची नोट (2000 Rupees Note) वितरणातून मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. ज्यांच्याकडे या नोटा आहेत त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याची वेळ दिली आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयावरुन राज ठाकरे (Raj Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली होती. नोटबंदीवर (Demonetisation) स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही, मात्र ज्यांनी काळा पैसा जमा केला आहे त्यांना त्रास होईल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोन हजाराची नोट ही वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. ही नोट काही बेकायदेशीर ठरवलेली नाही. ऑक्टोबरपर्यंत वितरणातून ही नोट बाहेर काढायची आहे. ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या नोटा बदलता येतील. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा (White Money) असेल अशा कुणालाही चिंता करण्याची गरज नाही. कुणी काळा पैसा (Black Money) जर जमा करुन ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नोटा बदलताना सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठून?
दोन हजारांच्या नोटा किंवा अशा नोटा बदलल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा फायदा,
जो मगील वेळीही नोटबंदीनंतर झाला होता. जे बनावट चलन पुश करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून (ISI) होतो तो हाणून पाडला जातो.
एकीकडे जो फेक करन्शी पुश करण्याचा प्रयत्न आहे तो या निर्णयामुळे त्यावर आळा बसेल.
ज्यांनी नोटा जमा करुन ठेवल्या असतील त्यांना आता तपशील द्यावा लागणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Web Title : Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis statement on two thousand note and he gave answer to critics

Related Posts