IMPIMP

Diabetes | शुगर लेव्हल वाढताच पायावर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, पाय कापण्याची येऊ शकते पाळी

by nagesh
Diabetes | diabetes symptoms in your feet signs indicate high blood sugar levels

सरकारसत्ता ऑनलाइन –  Diabetes | मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जो आयुष्यभर टिकतो. मधुमेहाची समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी (Glucose level) खूप जास्त असते किंवा आणखी सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर जेव्हा स्वादुपिंड इन्सुलिन (Pancreatic Insulin) अजिबात तयार करू शकत नाही किंवा ते अगदी कमी प्रमाणात तयार करते तेव्हा मधुमेहाची समस्या उद्भवते. मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. (Diabetes)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टाईप 1 आणि टाईप 2
टाईप 1 मधुमेहामध्ये (Type 1 Diabetes), स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही. त्याच वेळी, टाईप 2 मधुमेहामध्ये (Type 2 Diabetes), स्वादुपिंड खूप कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करते. मधुमेहाच्या आणखी एका प्रकाराला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. या तीन प्रकारच्या मधुमेहांमध्ये सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे या तिन्ही प्रकारांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त होते.

 

मधुमेहामुळे, व्यक्तीला पायांच्या दोन प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की डायबेटिक न्यूरोपॅथी आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज (पेरिफेरल आर्टरी डिसीज).

 

डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये, अनियंत्रित मधुमेह तुमच्या मज्जातंतूंना प्रभावित करू शकतो आणि नुकसान करू शकतो. तर, पेरिफेरल व्हस्कुलर डिसिज तुमच्या रक्तप्रवाहावर परिणाम करतो, ज्यामुळे पायांमध्ये विविध लक्षणे दिसतात. पायांमध्ये दिसणारी मधुमेहाची काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. (Diabetes)

 

पाय दुखणे, मुंग्या येणे आणि सुन्न होणे –
डायबेटिक न्यूरोपॅथी हा एक प्रकारचे नर्व्ह डॅमेज आहे जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होते. मेयो क्लिनिकच्या मते, डायबेटिक न्यूरोपॅथीत पाय आणि पायांमधील मज्जातंतूला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे पाय आणि हातांमध्ये वेदना आणि सुन्नपणा यासारखी लक्षणे दिसून येतात. याशिवाय, यामुळे पचनसंस्था, मूत्रमार्ग, रक्त पेशी आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र, काही लोकांमध्ये त्याची लक्षणे अतिशय सौम्य असतात, तर काहींमध्ये त्याची लक्षणे खूपच वेदनादायक असतात.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पायाला अल्सर
सामान्यतः, त्वचेला भेग पडणे किंवा खोल जखमेला अल्सर म्हणतात. डायबिटीज फूट ही एक खुली जखम असते आणि 15% मधुमेही रुग्णांना प्रभावित करते. हे प्रामुख्याने पायांच्या तळव्यामध्ये आढळते. काही प्रकरणांमध्ये, पायाच्या अल्सरमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते, परंतु गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे शरीराचा तो भाग कापला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी मधुमेहाचा धोका सुरुवातीपासूनच कमी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

 

एथलीट फुट
मधुमेहामुळे नसांना झालेल्या नुकसानीमुळे एथलीट फुटसह अनेक समस्या वाढू शकतात. एथलीट फुट हे फंगल इन्फेक्शन आहे ज्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि पायाला भेग जातात. हे एक किंवा दोन्ही पायांवर होऊ शकते.

 

गाठ किंवा कॉर्न आणि कॉलस
मधुमेहामुळे कॉर्न आणि कॉलसची समस्या देखील भेडसावू शकते. कॉर्न्स किंवा कॉलस उद्भवतात जेव्हा एखाद्या ठिकाणच्या त्वचेवर खूप दाब किंवा घासले जाते. तेव्हा ती त्वचा कठोर आणि जाड होऊ लागते.

 

पायाच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन
मधुमेही रुग्णांमध्ये नखांमध्ये फंगल इन्फेक्शन (Fungal infection) होण्याचा धोकाही खूप जास्त असतो.
हे सहसा अंगठ्याच्या नखावर परिणाम करते. या समस्येमुळे नखांचा रंग बदलू लागतो आणि ती जाड होतात,
काही प्रकरणांमध्ये नखे स्वतःच तुटू लागतात. काहीवेळा नखाला इजा झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतो.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गँगरीन
मधुमेहाचा रक्तपेशींवरही परिणाम होतो, त्यामुळे बोटांना आणि पायांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा फारच कमी किंवा नगण्य होतो.
जेव्हा रक्त प्रवाह अजिबात होत नाही आणि पेशी मरतात तेव्हा गँगरीन होते. त्यामुळे शरीराचा तो भाग कापण्याची शक्यताही खूप वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetes symptoms in your feet signs indicate high blood sugar levels

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खडकी येथील शाळेतून 5 वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

Maharashtra Monsoon Session | आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली – भरत गोगावले

Jumbo Covid Centre Scam | जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात संजय राऊतांसह त्यांचा मित्र अडचणीत, पोलिसांत तक्रार

 

Related Posts