IMPIMP

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा भोंग्यांबाबत मोठा निर्णय ! पोलिस प्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

by nagesh
Dilip Walse Patil | violation of conditions by raj thackeray will there be action home minister dilip walse patils statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse-Patil | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत (Loudspeaker On Mosque) घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. ठाण्यातील (Thane) सभेत त्यांनी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे (MNS Uttar Sabha). यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) आणि मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai CP) यांना एकत्र धोरण ठरवण्याचे आदेश दिल्याचं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं. एक – दोन दिवसांमध्ये महासंचालक आणि आयुक्त राज्यासाठी एकत्र धोरण ठरवतील. मुंबईसाठी राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली (Rules) जाहीर करण्यात येईल, असं दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सांगितलं.

 

मी अनेकवेळा सांगितलं आहे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नका. जर जाणीवपूर्वक कोणी तसा प्रयत्न केला आणि दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. मग तो कोणताही व्यक्ती असो किंवा कोणत्या संघटनेचा आणखी कोणी असो, अशा शब्दात वळसे पाटील यांनी इशारा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत.
मात्र याबाबत मुस्लिम धर्मियांनी (Muslim) माणुसकीने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे.
जर लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावणार असतील तर त्यांना आमच्याही आरत्या ऐकायला लागतील, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Dilip Walse Patil | maharashtra home minister dilip walse patil over loudspeaker issue

 

हे देखील वाचा :

Nana Patole Criticize Raj Thackeray | ‘त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे’; नाना पटोलेंनी नाव न घेता केली राज ठाकरेंवर कारवाईची मागणी

Pune Crime | कर्वेनगर परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | ‘जपानमधून 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करतो’ असे सांगून व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडा

 

Related Posts