IMPIMP

Driving License | कामाची बातमी : घरबसल्या रिन्यू करू शकता ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या कसा करावा अर्ज ?

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाDriving License | तुम्हाला RTO कार्यालयात न जाता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करायचे असेल तर तुम्ही परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या बनवता येईल. (Driving License)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

यासाठी तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan येथे अर्ज करावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळतो. या कालावधीनंतर तुम्ही नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल जो ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रकारावर अवलंबून असेल.

 

हे दस्तऐवज असणे आवश्यक

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्डचा फोटो यासारखी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर, 30 दिवसांच्या आत, तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्ट ऑफिसद्वारे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला कशी प्रक्रिया करावी लागेल ते जाणून घेवूयात. (Driving License)

 

40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना हे काम करावे लागेल

तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असल्यास, जे तुम्हाला ऑनलाइन नूतनीकरण करायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म 1 ए भरून डॉक्टरांकडून प्रमाणित करावा लागेल.

हा फॉर्म तुम्हाला parivahan.gov.in या वेबसाइटवर सहज मिळेल. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असल्यास तुम्हाला फॉर्म 1 ए ची आवश्यकता नाही.

 

हा फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी फॉर्म parivahan.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल. यानंतर, हा फॉर्म स्कॅन केल्यानंतर, एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे ठेवा जेणेकरून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करता तेव्हा फॉर्म सहज अपलोड करता येईल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या स्टेप फॉलो करा

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी, सर्वप्रथम भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/ वर जा.

येथे तुम्हाला डाव्या बाजूला Apply Online वर क्लिक करावे लागेल.

आता ’सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन्स’ वर क्लिक करा आणि नंतर दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

दिलेला अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होईल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.

 

Web Title :- Driving License | how to renew apply driving license driving licence download driving licence online

 

हे देखील वाचा :

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत होईल 5000 रूपयांचे मंथली इन्कम, सरकार देते गॅरंटी, जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार यश दत्ता होळेकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 83 वी कारवाई

Vidhan Parishad Election 2022 | ठाकरे सरकारमध्ये फोडाफोडी ! काँग्रेसकडून थेट शिवसेनेच्या आमदारांना फोन

 

Related Posts