IMPIMP

Driving License New Rules | केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स नियमात केला ‘हा’ बदल; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Driving License New Rules | सर्व वाहनधारकांकडे कायद्यानुसार चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स बाबत केंद्र सरकार (Central Government) वेळोवेळी अपडेटच्या सूचना देत असते. आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून बदल केला आहे. नवीन नियम (Driving License New Rules) लागू झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसला (RTO) हेलपाटा मारण्याची आवश्यकता नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नव्या नियमांनुसार, आता तुम्हाला कोणतीही ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओमध्ये जावून द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (Union Ministry of Road Transport and Highways) नवे नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी वेटिंग यादीमध्ये असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे. (Driving License New Rules)

 

केंद्राच्या नव्या नियमानुसार, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (DL) कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये (Driving Training School) रजिस्ट्रेशन करू शकता. इथूनच ट्रेनिंग घेतल्यानंतर इथेच टेस्ट पास करावी लागणार आहे. टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्कूल एक सर्टिफिकेट देईल. या सर्टिफिकेटच्या बेसवर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तयार केलं जाईल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही द्यावे लागेल. लाइट मोटर व्हेईकलसाठी कोर्सचा कालावधी 4 आठवड्यांचा आहे, जो 29 तास असणार आहे. प्रॅक्टिकलसाठी रस्ते, हायवे, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग अशा प्रॅक्टिकलसाठी 21 तासांचा वेळ द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर आठ तास थेअरीसाठी असणार आहे.

 

ट्रेनिंग सेंटरसाठी केंद्राकडून गाइडलाइन्स काय ?

दुचाकी, 3 चाकी आणि हलक्या मोटर वाहनांसाठी ट्रेनिंग सेंटर्ससाठी किमान 1 एकर जागा असावी.

अवजड वाहनं अथवा ट्रेलरसाठी ट्रेनिंग सेंटर्सकडे 2 एकर जागा असणं गरजेचं आहे.

ट्रेनिंग सेंटरमधील ट्रेनर किमान 12 वी पास असणे आवश्यक.

त्याशिवाय किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणंही आवश्यक आहे.

ट्रेनिंग सेंटरवर बायोमेट्रिक सिस्टम असणे गरजेचं आहे.

ड्रायव्हिंग सेंटर्समधील अभ्यासक्रम थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा 2 भागात असणे आवश्यक.

मीडियम आणि हेवी मोटर व्हेईकलसाठी 6 आठवड्यात 38 तासांचा कोर्स अवधी असावा.

यामध्ये 8 तास थेअरी आणि 31 तास प्रॅक्टिकल असावे.

 

Web Title :- Driving License New Rules | driving license new rule from 1 july 2022 know more

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये’ – देवेंद्र फडणवीस

Tips For Buying Cucumber | काकडी कडू आहे कि गोड असे ओळखा, या टिप्सने तोबडतोब दूर होईल Cucumber चा कडूपणा

Kasara Ghat Accident | घाट उतरत असताना क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी

 

Related Posts