IMPIMP

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम

by nagesh
e-SHRAM Card | farmers registration on e shram card online e shram card benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था e-SHRAM Card | आतापर्यंत 20 कोटी 96 लाखांहून अधिक कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. काल एका दिवसात 30 लाखांहून अधिक नोंदणी झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने (Central Government) असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक बळासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले. (e-SHRAM Card)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सरकारने या पोर्टलद्वारे देशभरात पसरलेल्या सुमारे 38 कोटी कामगारांना जोडण्याचे काम सुरू केले आहे. जेणेकरुन असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांचा डाटा तयार करून त्यांना सरकारी योजनांशी जोडता येईल.

 

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणार्‍या कामगाराला ई-श्रम कार्ड जारी केले जाते, ज्याच्या मदतीने कामगार देशात कुठेही, केव्हाही विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ शकतो. (e-SHRAM Card)

 

कोरोनाच्या काळात (Coronavirus) सरकारने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना आर्थिक मदत दिली होती. ई-श्रम कार्ड असलेल्या कामगारांच्या खात्यात उत्तर प्रदेश सरकार देखभाल भत्ता जारी करत आहे. दरमहा 500 रुपये दराने कामगारांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ई-श्रम योजनेअंतर्गत मिळणार्‍या सुविधा

कामगारांना 2 लाखांपर्यंतचा अपघात विमा.

भविष्यात लाभार्थ्यांना पेन्शनचा लाभ देण्याची सरकारची तयारी.

उपचारासाठी आर्थिक मदतही दिली जाईल.

गर्भवती महिलांना मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे दिले जातील.

घरबांधणीसाठी शासनाकडून निधी दिला जाणार.

मुलाच्या शिक्षणासाठीही सरकार आर्थिक मदत करेल.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ थेट खात्यात वर्ग करणार.

नोंदणीकृत कामगार अपघाताचा बळी ठरल्यास, मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.

अपघातात अंशतः अपंगत्व आले तर विमा योजनेंतर्गत एक लाख रुपये मिळतील.

कोण करू शकतात नोंदणी
ई-श्रम कार्ड फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. जे घरगुती कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील पगारदार कामगार आहेत आणि ESIC किंवा EPFO चे सदस्य नाहीत, त्यांना असंघटित कामगार म्हणतात.

 

असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरकामगार यांचा समावेश होतो.

 

असंघटित क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या आस्थापनांचा समावेश होतो. या आस्थापनांमध्ये 10 पेक्षा कमी कामगार काम करतात. ही आस्थापने येथे काम करणार्‍या कामगारांना ESIC, EPFO सारख्या सुविधा मिळत नाहीत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शेतकरी करू शकतात का नोंदणी
शेतकर्‍यांबाबत, ई-श्रम पोर्टलवर हे स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र आहेत. स्वत:ची जमीन असलेल्या शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश नाही.

 

कशी होईल नोंदणी
16 ते 59 वयोगटातील कोणताही कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. ई-श्रम पोर्टल eshram.gov.in वर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन नोंदणी करता येते. ई-श्रम कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, टोल फ्री क्रमांक 14434 वर कॉल केला जाऊ शकतो.

 

ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे हे लक्षात ठेवा. नोंदणीसाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.

 

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी, कामगाराला नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक यासारखी माहिती नोंदवावी लागेल. तुम्ही नोंदणीसाठी आधार क्रमांक टाकताच, तेथील डेटाबेसमधून कामगाराची सर्व माहिती आपोआप पोर्टलवर दिसेल.

12 अंकी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर
ई-श्रम कार्डमध्ये 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन असेल.
हे कार्ड देशात सर्वत्र वैध असेल. यूएएन क्रमांक हा कायमस्वरूपी क्रमांक असेल म्हणजेच एकदा प्रदान केल्यानंतर तो बदलता येणार नाही.
ई-श्रम कार्ड आजीवन वैध आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- e-SHRAM Card | farmers registration on e shram card online e shram card benefits

 

हे देखील वाचा :

Google Chrome | सरकारचा Alert! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर, अन्यथा होईल मोठे नुकसान

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले – ‘या बातम्या खोट्या आहेत, शिवसेना पक्षात फक्त…’

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts