IMPIMP

Google Chrome | सरकारचा Alert! ताबडतोब अपडेट करा Google Chrome ब्राउजर, अन्यथा होईल मोठे नुकसान

by nagesh
Google Chrome | Central government alert update google chrome browser immediately hackers can make you victims

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Google Chrome | तुम्ही गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. सरकारने क्रोम यूजर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने वापरकर्त्यांना त्यांचे ब्राउझर त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. हा इशारा केवळ त्या यूजर्ससाठी आहे जे Chrome व्हर्जनचे 97.0.4692.71 पेक्षा जुने व्हर्जन वापरत आहेत. हे युजर्स हॅकर्सला बळी पडू शकतात. (Google Chrome)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

CERT-BZ अ‍ॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की Google Chrome ब्राउझरमध्ये अनेक कमतरता आढळल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की गुगल क्रोम टाइप कन्फ्युजनमुळे V8 मध्ये Google Chrome प्रकार वापरणे सुरक्षित नाही.

 

यात वेब अ‍ॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल्स एपीआय, ऑटो-फिल आणि डेव्हलपर टूल्स यासारख्या अनेक कमतरता आढळून आल्या आहेत. सरकारचे म्हणणे आहे की जर एखाद्या यूजरने गुगल क्रोम अपडेट केले नाही तर डिव्हाइसचे रिमोट हॅक होण्याचा धोका कायम राहील.

 

कोणताही सायबर हल्लेखोर या त्रुटींचा फायदा घेऊ शकतो आणि क्रोम येजरला कोणत्याही मॅलेशियसशिवाय वेब पेजवर नेले जाऊ शकते.
हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेण्यात यशस्वी झाल्यास, ते तुमच्या डिव्हाइसवर मॅलेशियस कोड रन करू शकतील आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतील.
अशा परिस्थितीत सरकारसोबतच गुगलच्या टीमनेही यूजर्सना क्रोम ब्राउझर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुगल क्रोम ब्राउझर कसे अपडेट करावे

सर्व यूजरने त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी जुना क्रोम ब्राउझर अपडेट करावा.

अपडेट करण्यासाठी, Chrome ब्राउझर उघडा आणि मेनूवर जा.

त्यानंतर हेल्प ऑप्शनवर क्लिक करा.

येथे तुम्हाला अबाऊट गुगल क्रोम नावाचा पर्याय दिसेल.

तुम्ही येथे जाताच तुमचा Chrome ब्राउझर अपडेट होण्यास सुरुवात होईल.

यानंतर तुम्हाला रीलाँच वर क्लिक करावे लागेल.

 

Web Title :- Google Chrome | Central government alert update google chrome browser immediately hackers can make you victims

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले – ‘या बातम्या खोट्या आहेत, शिवसेना पक्षात फक्त…’

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम

 

Related Posts