IMPIMP

Earn Money | ‘या’ फंडने एका वर्षात दिला 99.68% चा रिटर्न, बनला बेस्ट इक्विटीज प्रॉडक्ट, तुम्ही सुद्धा करू शकता गुंतवणूक

by nagesh
NPS Or EPF Which Is Better | nps or epf which is better for your retirement planning

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | जर तुम्ही विशेष परिस्थितीत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला चांगला फायदा मिळतो. उदाहरणार्थ, ज्याने कुणी ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड (ICICI Prudential India Opportunities Fund) मध्ये एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली असेल त्यास 99.68% चा रिटर्न (Earn Money) मिळाला आहे.

 

आकडे सांगतात की ICICI Prudential India Opportunities Fund ने डायव्हर्सिफाईडच्या बहुतांश इक्विटी कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त रिटर्न दिला आहे. फंड इंडस्ट्रीमध्ये बेस्ट लार्ज कॅपचा रिटर्न 69.12% एक वर्षात होता. तर बेस्ट लार्ज अँड मिड कॅपचा रिटर्न 79.40%, बेस्ट मल्टीकॅपचा 75.88%, बेस्ट मिडकॅप फंडचा 85.69%, बेस्ट ELSS फंडचा 80%, बेस्ट फोकस फंडचा 83.76% रिटर्न होता.

 

काय सांगतो रिसर्च?

व्हॅल्यू रिसर्चच्या आकड्यांनुसार, जानेवारी 2019 मध्ये लाँच ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये एखाद्याने तेव्हा गुंतवणूक केली असती तर त्याची 10 रुपयांची गुंतवणूक 18.55 रुपये झाली आहे. तर निफ्टी 500 TRI इंडेक्समध्ये चा गुंतवणुकीने 39.6% चा फायदा दिला आहे. हा फंड पावर, टेलीकॉम, फार्मा, मेटल्स आणि ऑयल अँड गॅसमध्ये ओव्हरवेट आहे. (Earn Money)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मागील एका वर्षात या फंडने ज्यामध्ये गुंतवणूक केली त्यामध्ये टाटा स्टीलने 261%, हिंडालकोने 197%, टाटा पावरने 161%, ONGC ने 103% आणि एयरटेलने 67% चा रिटर्न दिला आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत त्याची लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक 77.25%, मिड कॅपमध्ये 9 आणि स्मॉल कॅपमध्ये 13.75% होती.

 

काय आहे स्पेशल सिच्युएशन फंड?
स्पेशल सिच्युएशन फंडचा अर्थ आहे की कधी-कधी मार्केटचे सायकल किंवा इंडस्ट्रीच्या खराब वातावरणामुळे कंपन्यांना अडचण असते. अशा वातावरणात गुंतवणुकदारांना संधी निर्माण होते. ICICI प्रूडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड सामान्यपणे मूलभूतपणे मजबूत (fundamentally strong) कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, ज्या विशेष स्थितीमुळे अस्थायी अपयशाचा सामना करत आहेत. (Earn Money)

 

ICICI प्रूडेंशियल म्यूचुअल फंडचे ED आणि CIO एस. नरेन या फंडचे मॅनेजर आहेत.
ते म्हणतात की, मोठ्या कालावधीत स्पेशल सिच्युएशन इन्व्हेस्टिंगची पद्धत चांगली रिटर्न देते.
जवळच्या कालावधीत यामध्ये चढ-उतार दिसू शकतो.

 

कोरोनाच्या आजाराने अशाप्रकारच्या अनेक स्पेशल सिच्युएशन संधी प्रदान केल्या.
अशा स्थिती गुंतवणुकीची संधी देतात. गुंतवणुकदार त्या विशेष स्थितीत लपलेली संधी स्पष्ट पाहू आणि समजू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय म्हणतात एक्सपर्ट?
अल्ट्रा हाय नेटवर्थ लोकांसाठी काम करणारे फ्लेक्सी कॅपिटलचे मॅनेजिंग पार्टनर नासिर सलीम यांनी म्हटले की,
या फंडने मागील एक वर्षात फार्मा आणि टेलीकॉम सारख्या काही खुपच आकर्षक सेक्टरमध्ये डाव लावून सुपर रिस्क अ‍ॅडजस्टेड रिटर्न दिला आहे.
सध्याच्या महामारीच्या काळात हा एक शुभ संकेत आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Earn Money | icici prudential india opportunities fund give above 99 percent return in one year check details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला ‘समेट’साठी वेळ, फारकतीच्या कालावधीत 27 वर्षीय पत्नीवर 32 वर्षीय पतीचा ‘बलात्कार’

Pune Crime | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख

Sanjay Raut | ‘2024 पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी’ – संजय राऊत

 

Related Posts