IMPIMP

ED Arrest NCP Leader Nawab Malik In Money Laundering Case | ठाकरे सरकारमीधल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; दाऊद इब्राहिम मनी लॉड्रींग केसशी कनेक्शन

by nagesh
Nawab Malik | ed authority allows seizure of ncp leader nawab malik s assets which is located in mumbai and osmanabad

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन ED Arrest NCP Leader Nawab Malik In Money Laundering Case | ठाकरे सरकारमीधल मंत्री राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने Enforcement Directorate (ED)
अटक केली आहे. डॉन दाऊदचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशी केली
होती. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन मलिक यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. (ED Arrest NCP
Leader Nawab Malik In Money Laundering Case)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ईडीचे एक पथक पहाटे 5 वाजता नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते.. तेव्हा नवाब मलिक यांनी आपणच ईडीच्या कार्यालयात 7 वाजता येतो,
असे सांगितले. त्यानुसार सकाळी 7 वाजता नवाब मलिक (NCP Nawab Malik) हे ईडी कार्यालयात (ED Office Mumbai) पोहचले. तेथे त्यांची
दुपारपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉड्रींग केसशी कनेक्शन असल्यामुळं त्यांना अटक करण्यात
आल्याचं एएनआयनं ट्विटव्दारे सांगितलंय.

 

 

मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering) नवाब मलिक यांची ईडी अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु होती. 1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची जमीन नवाब मलिक यांनी घेतल्याचा आरोप भाजपने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दाऊद इब्राहिम हा भारतात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एनआयएला संशय असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीजकडून तपास केला जात आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा दाऊदचे नाव वापरुन जमीन व्यवहार करत असतो. त्यात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. इक्बाल कासकर याच्याकडे ईडीने चौकशी केली होती. त्यात कासकर याने मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच मलिक यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे आणि आता त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

भाजप (BJP) व मोदी सरकारवर (Modi Government) मलिक हे आरोप करीत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई केली
जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

 

दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर कोठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त (Police Bandobast) वाढविला आहे.
बॅरिकेट लावून परिसरात लोक जमू नये, अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- ED Arrest NCP Leader Nawab Malik In Money Laundering Case | Enforcement Directorate arrests NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik in connection with Dawood Ibrahim money laundering case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात तरुणाचा खून; मृतदेह दरीत फेकल्यानं प्रचंड खळबळ

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलातील नवापुर पोलीस ठाण्यातील महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

Nandurbar Police | ‘नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होतो’- IG बी.जी. शेखर पाटील

 

Related Posts