IMPIMP

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

by nagesh
Nitesh Rane | andheri by election bjp mla nitesh rane attacks shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri By Election) राज्यात राजकारणाचा एक अंक रंगला होता. अखेर न्यायालयाने आयुक्तांची चांगली खरडपट्टी काढत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा प्रलंबित राजीनामा (Resignation) स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे या अंकावर पडदा पडला. आता पुन्हा नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्यावरुन भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केले आहे. रमेश लटके यांचा मातोश्रीवर अनेकदा अपमान झाला, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रमेश लटके यांचा मातोश्रीवर कितीदा अपमान झाला हे मला माहीत आहे. उद्धव ठाकरे त्यांचा फोन देखील घेत नव्हते. माणूस जीवंत असताना त्याला किंमत दिली नाही. आता मृत्यूनंतर त्यांचा घाणेरड्या राजकाणासाठी वापर करुन घेतला जात आहे. आज लटके जीवंत असते, तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आले असते, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

 

शिवसेनेचा ठाकरे गट एकीकडे सहानुभुतीची भाषा करतो. पण दुसरीकडे वांद्रे विधानसभेतील दिवंगत बाळा सावंत (Late Bala Sawant) यांच्या पत्नी तृप्ती सावंत (Tripti Sawant) यांचा फोन देखील ते घेत नाहीत. त्यांना भेट देत नाहीत. निवडणुकीपूरता त्यांनी त्यांचा वापर करुन घेतला. ऋतुजा लटके यांच्यासोबत देखील तेच होणार आहे, असा आरोप देखील राणेंनी केला आहे.

 

मुरजी देसाई (Murji Desai) अंधेरीच्या प्रत्येक मतदाराला परिचीत आहेत. काका म्हणून लोक त्यांना ओळखतात.
प्रत्येकाच्या अडचणीत ते धावून जातात.
म्हणून तेच आमदार म्हणून पुढे येतील आणि त्याचा उत्साह विभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.
त्यामुळे अंधेरीत इतिहास घडणार आहे, असे नितेश राणे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nitesh Rane | andheri by election bjp mla nitesh rane attacks shivsena uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Sourav Ganguly ने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

CM Eknath Shinde | शिवसेनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाप्रमूखाचा शिंदे गटात प्रवेश

 

Related Posts