IMPIMP

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना मोठा धक्का ! जिल्हा दुध संघाने अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, संचालकमंडळावर कारवाई करण्याचे आदेश; मंदाकिनी खडसेंच्या अडचणीत वाढ

by nagesh
Eknath Khadse | another big blow to eknath khadse from shinde government order to take action against directors of jalgaon district milk union

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Khadse | जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon District Milk Union) संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (National Agricultural Development Scheme) मार्गदर्शक तत्वांचे पालन न करता व शासनाची मान्यता न घेता, परस्पर निर्णय घेवून, 9 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीचा अतिरिक्त खर्च केला, असा ठपका राज्य सरकारकडून (State Government) ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी संचालक मंडळावर कार्यवाही करुन त्याचा अहवाल 15 दिवसात पाठवण्याच्या सूचनाही शासनाचे उपसचिव नि. भा. मराठे (N.B. Marathe) यांनी सहकारी संस्था दुग्ध विभागाच्या सहनिबंधकांना दिल्या आहेत. या आदेशामुळे विद्यमान संचालक मंडळासह चेअरमन मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse), आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात शिंदे-भाजपची सत्ता (Shinde-BJP Government) आल्यानंतर गेल्याच महिन्यात दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक मंडळ बसविण्यात आले होते.
तसेच नागराज पाटील (Nagraj Patil) यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मागणीनुसार शासनाने दुध संघातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती.
या चौकशी समितीने प्राथमिक चौकशी करत, दुध संघातील मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पावर मंजूर तरदुतीपेक्षा 5 कोटी 92 लाख व दुग्धजन्य उपपदार्थ प्लॅन्टचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण या प्रकल्पावर तीन कोटी 99 लाख,
असा एकूण 9 कोटी 97 लाखांचा अतिरिक्त खर्च शासनाची परवानगी न घेताच करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

 

चौकशी समिती अहवालात काय म्हटलं ?

चौकशी समितीने (Inquiry Committee) हा अहवाल राज्याची सहकारी संस्था (दुग्ध) यांच्याकडे सुपूर्द केला.
यावरुन संस्थेचे उपसचिव नि. भा. मराठे यांनी आज एका पत्राच्या माध्यमातून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
यात म्हटले आहे की, चौकशी अहवालानुसार जळगाव जिल्हा दूध संघाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या
मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन (Violation of Guidelines)
करुन संचालक मंडळाने परस्पर निर्णय घेऊन शासनासह जिल्हा दूध संघाच्या निधीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे संबंधीत आर्थिक अनियमितता लक्षात घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 2013
मधील तरतुदीनुसार संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करुन याचा अहवाल 15 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या तत्कालीन अध्यक्षा आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)
यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ यामुळे अडचणीत आले असून त्यांच्यावर कारवाई होणार
असल्याचने राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

Web Title : – Eknath Khadse | another big blow to eknath khadse from shinde government order to take action against directors of jalgaon district milk union

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ऑफिसमधील महिलेशी ‘चॅट’ करण्यावरुन तरुणाचे अपहरण करुन मागितली 20 लाखांची खंडणी; तिघांना अटक

Pune News | श्री उवस्सहग्गरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचे आयोजन

Chandrakant Patil | फडणवीसांना पुण्यातून खासदारकी देण्याच्या मागणीवर चंद्रकांत पाटील म्हणाले -‘फडणवीस स्वत:च्या कर्तुत्वावर इतके वर आले’

Related Posts