IMPIMP

PM Shinzo Abe | माजी PM शिंजो आबे यांच्या हत्येनंतर VVIP च्या 360 डिग्री सुरक्षेबाबत केंद्र सरकारने राज्यांना पाठवली नवी अ‍ॅडव्हायजरी

by nagesh
PM Shinzo Abe | after the assassination of former pm shinzo abe the central government sent a new advisory to the states regarding 360 degree security of vvips

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PM Shinzo Abe | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (PM Shinzo Abe) यांच्या खुलेआम झालेल्या हत्येतून धडा घेत केंद्र सरकारने (Central Government) व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत (VVIP Security) राज्यांना नवीन अ‍ॅडव्हायजरी पाठवली आहे. 5 मुद्यांच्या या अ‍ॅडव्हायझरीमध्ये व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत हाय अलर्ट (Keep VVIP Security On High Alert) राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये समोरून तसेच मागच्या बाजूनेही सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. (PM Shinzo Abe)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिंजो आबे (PM Shinzo Abe) यांना तरुणाने मागून गोळ्या झाडल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, जपानमध्ये माजी पंतप्रधानांच्या हत्येनंतर काही तासांतच केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यासाठी राज्यांना ही अ‍ॅडव्हायजरी पाठवली होती.

 

केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या नवीन अ‍ॅडव्हायजरीमध्ये मागील बाजूने व्हीव्हीआयपींची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्राने म्हटले आहे की, जेव्हा व्हीव्हीआयपी मंचावर बसतात तेव्हा मागून सर्व लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले पाहिजेत.

 

विशेषत: रॅलींमध्ये अशी व्यवस्था करायला हवी. तज्ज्ञ सांगतात की, व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत सर्वाधिक लक्ष त्यांच्या पुढच्या बाजूवर असते, त्यामुळे अनेक वेळा मागच्या बाजूने सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.
हे पाहता केंद्राने या मुद्यावर भर दिला आहे.

 

केंद्र सरकारनेही पत्रात म्हटले आहे की, व्हीव्हीआयपींजवळ होणारी गर्दी रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात.
व्हीव्हीआयपींच्या जवळ कोण येतंय यावर बारीक नजर ठेवा.
व्हीव्हीआयपींकडे जाणार्‍या रस्त्याची कसून तपासणी केली पाहिजे आणि तिथून येणार्‍या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकारने म्हटले आहे की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की,
व्हीव्हीआयपी परिसराच्या अगदी जवळ कोणालाही जाऊ देऊ नये.
व्हीव्हीआयपींच्या जवळ राहणार्‍या लोकांचीही कसून चौकशी झाली पाहिजे.
सुरक्षा कर्मचार्‍यांनी तेथे नेहमी उपस्थित राहून जवळच्या लोकांवरही लक्ष ठेवले पाहिजे.
पत्रात म्हटले आहे की, व्हीव्हीआयपींच्या सामानाचीही तपासणी करावी. विशेषत: तेव्हा, जेव्हा शस्त्र मिळण्याची शक्यता असते.

 

नवीन निर्देशामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी व्हीव्हीआयपींवर 360 डिग्रीतून नजर ठेवली पाहिजे.
व्हीव्हीआयपींच्या भेटीपूर्वी सरप्राईज ड्रिल करून सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करावी.
काही झालेच तर व्हीव्हीआयपींना सुरक्षित रुग्णालयात कसे घेऊन जायचे याबाबतही आराखडा अगोदरच तयार करायला हवा.

 

Web Title :- PM Shinzo Abe | after the assassination of former pm shinzo abe the central government sent a new advisory to the states regarding 360 degree security of vvips

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | कॅनडा विद्यापीठात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

Devendra Fadnavis | ‘माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं अन् मी उपमुख्यमंत्री झालो’ – देवेंद्र फडणवीस

Diabetes Control Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावेत ‘हे’ 5 वर्कआऊट, जाणून घ्या

 

Related Posts