IMPIMP

EPFO | नॉन-रिफंडेबल EPF अ‍ॅडव्हान्ससाठी ऑनलाइनसुद्धा अर्ज करू शकतात EPFO सदस्य, जाणून घ्या पद्धत

by nagesh
EPFO | epfo members can apply for non refundable epf advance online

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPFO | तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर कर्ज शोधण्याची चिंता सोडून द्या. आता तुम्ही तुमच्या PF फंडातून तुमच्या विशेष गरजा देखील पूर्ण करू शकता. (EPFO )

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पीएफ खात्यात कर्मचार्‍यांचे योगदान, कंपनीचे योगदान आणि पीएफ खात्यात मिळालेल्या व्याजाची रक्कम जमा केली जाते. सरकारने खातेदाराला विशिष्ट परिस्थितींमध्ये विशिष्ट अटींसह निधीचा काही भाग काढण्याची परवानगी दिली आहे.

 

आता EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांना काही अटींसह EPF खात्यातून नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स काढण्याची परवानगी देत आहे. पण यासाठी मर्यादा आहे.

 

EPF चे नियम सांगतात की खातेदार त्याच्या खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी फक्त 75 टक्के रक्कम किंवा तीन महिन्यांच्या मूळ पगाराच्या बरोबरीने डीए म्हणजेच महागाई भत्ता काढू शकतो. लक्षात ठेवा की एकूण जमा रकमेच्या फक्त 75 टक्के किंवा तीन महिन्यांचा मूळ पगार अधिक महागाई भत्ता, यापैकी जे कमी असेल ते काढता येते.

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नॉन रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स तीन कामकाजाच्या दिवसांत (Working Days) मिळेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

परंतु यासाठी, ऑनलाइन क्लेम फॉर्म योग्यरित्या भरणे आणि सदस्याने पात्रता अट पूर्ण करणे अनिवार्य आहे.

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती शेअर केली आहे. घर/फ्लॅट/साइट खरेदी किंवा बांधकामासाठी ईपीएफ आगाऊ घेता येतो. हा अ‍ॅडव्हान्स गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देखील वापरता येतो.

 

याशिवाय सध्याचे घर बदलणे, कुटुंबातील सदस्याचे आजारपण, कुटुंबातील कोणाचे लग्न, मुलांचे मॅट्रिकोत्तर शिक्षण, नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीतही ईपीएफ अ‍ॅडव्हान्स घेता येतो. तुम्ही किमान एक महिन्यासाठी बेरोजगार असाल किंवा वरिष्ठ पेन्शन विमा योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही या नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी देखील पात्र आहात.

 

ऑनलाइन दाव्याची योग्य प्रक्रिया जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफ सदस्य युनिफाइड मेंबर पोर्टल किंवा UMANG अ‍ॅपद्वारे नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करू शकतात.

स्टेप 1. unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या लिंकवर जा.

स्टेप 2. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

स्टेप 3. ऑनलाइन सेवा पर्याय निवडा.

स्टेप 4. आता ऑनलाइन सर्व्हिस क्लेमवर जा (फॉर्म 31, 19, 10C आणि 10D).

स्टेप 5. तुमचे नाव लिहिलेला बँकेचा चेक अपलोड करा.

स्टेप 6. सबमिट पर्याय निवडल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- EPFO | epfo members can apply for non refundable epf advance online

 

हे देखील वाचा :

Delhi Sessions Court | ‘सासरचा प्रत्येकजण हुंड्याच्या छळाचा आरोपी होऊ शकत नाही’ – न्यायालयाचा मोठा निर्वाळा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ! 10 हजार गुंतवा अन् मिळवा 16 लाख रुपये; जाणून घ्या

Pune Crime | 17 वर्षीय मुलीच्या गळ्याचा रिक्षाचालकाने घेतला चावा, शरिराशी झटून केलं घृणास्पद कृत्य&nbsp

Related Posts