IMPIMP

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System

by nagesh
Facial Recognition Technology (FRT) | boarding pass airports will soon be made just by showing face frt system will start at Lohegaon Airport Pune as well as varanasi, kolkata and vijaywada in march 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Facial Recognition Technology (FRT) | देशात लवकरच विमातळावर (Airport) केवळ चेहरा दाखवल्याने प्रवेश आणि निर्गमन (Entry and Exit Point) पासून बोर्डिंग पास (Boarding Pass) पर्यंतच्या सुविधा मिळतील. गुरुवारी नागरी उड्डयन राज्यमंत्री (Minister of State for Civil Aviation) जनरल व्ही.के. सिंह (General V.K. Singh) यांनी लोकसभेत (Lok Sabha) सांगितले की, भारतात चार विमानतळांवर (वाराणसी-Varanasi, पुणे-Lohegaon Airport Pune, कोलकाता-Kolkata आणि विजयवाडा- Vijayawada) डिजी प्रवासाच्या (Digi Travel) पहिल्या टप्प्यात लवकरच चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान (FRT System) लावले जाईल. Facial Recognition Technology (FRT)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) एफआरटी आधारित बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टम (Biometric Boarding System) च्या योजनेवर काम करत आहे. त्यांनी सांगितले की, प्रस्तावित डिजी प्रवास सेंट्रल इको-सिस्टम (Digi Travel Central Ecosystem) मार्च 2022 मध्ये लाइव्ह करण्याची योजना आहे. चार विमानतळांवर मशीन्स लावल्यानंतर विविध विमानतळांवर सुद्धा हे तंत्रज्ञान आवलंबले जाईल. (Facial Recognition Technology (FRT))

 

खासदार वरुण गांधी आणि रामशंकर कठेरिया (MP Varun Gandhi and Ramshankar Katheria)
यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सिंह यांनी सांगितले की, प्रवाशांच्या डाटाच्या सुरक्षेसाठी डिजी प्रवास सेंट्रल इकोसिस्टमसाठी नोंदणी करणे प्रवाशांसाठी ऐच्छिक असेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कशी काम करते FRT System

तज्ज्ञांनुसार, प्रवाशांचा चेहरा एकदा डिजी प्रवास सिस्टमने नोंदणी केल्यानंतर
त्यांना विमानतळात प्रवेश करताना ओळखपत्र दाखवण्याची आवश्यकता असणार नाही.
टर्मिनलमध्ये प्रवाशाने प्रवेश करताच एअरलाईन्स कंपनीला प्रवासी आल्याची माहिती मिळेल.
यानंतर सिस्टमद्वारे प्रवाशाचा बोर्डिंग पाससुद्धा थेट त्याच्या फोनमध्ये पाठवला जाईल.

 

Web Title :- Facial Recognition Technology (FRT) | boarding pass airports will soon be made just by showing face frt system will start at Lohegaon Airport Pune as well as varanasi, kolkata and vijaywada in march 2022

 

हे देखील वाचा :

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?

IND Vs NZ | मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के ! दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

 

Related Posts