IMPIMP

Farmers Unique ID | शेतकर्‍यांना मिळेल यूनिक ID, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे होईल सोपे

by nagesh
 Farmers Unique ID | Modi government creating unique ids of farmers enrolled under agri schemes says minister tomar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Farmers Unique ID | देशातील शेतकर्‍यांना विशेष ओळखपत्र (Farmers Unique ID) देण्याच्या प्रक्रियेवर सरकार सतत काम करत आहे. आतापर्यंत 11.5 कोटी शेतकर्‍यांपैकी जवळपास साडेपाच कोटी शेतकर्‍यांचा डेटाबेस तयार झाला आहे, ज्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाईल. मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमरकर यांनी याबाबत माहिती दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

सरकारचे म्हणणे आहे की, या विशिष्ट ओळखपत्राच्या मदतीने शेतकर्‍यांच्या अनेक समस्या सुटू शकतात. या माध्यमातून शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांचा लाभ कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकतील. यातून त्यांना कोणत्याही मध्यस्थीची गरज भासणार नाही. (Farmers Unique ID)

 

KYF च्या द्वारे शेतकर्‍यांची पडताळणी
ओळखपत्र बनवण्याच्या योजनेत ई-नो युअर फार्मर्स (e-KYC) च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या पडताळणीची तरतूद आहे. यामध्ये विविध योजनांच्या अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये वारंवार भौतिक कागदपत्रे जमा करण्याची गरज भासत नाही.

लोकसभेत याबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली होती. यावर नरेंद्र तोमर (narendra singh tomar) यांनी सांगितले की, देशात एकुण 11.5 कोटी शेतकर्‍यांपैकी साडेपाच कोटी शेतकर्‍यांचा डाटाबेस तयार केला आहे. उर्वरित काम सुरू आहे. ज्या शेतकर्‍यांना पंतप्रधान कल्याण निधी योजनेने (PM-Kisan) दरवर्षी तीनवेळा दोन-दोन हजार रुपयांचे समान हप्ते दिले जातात, त्या सर्व शेतकर्‍यांना या आयडीचा लाभ प्राप्त होईल.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

योजनांचा लाभ घेणे होईल सोपे
देशात शेतकर्‍यांच्या कल्याणासह कृषी क्षेत्रासाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारे चालवत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रत्येक सीझनमध्ये मेहनत घ्यावी लागते.

 

ओळखपत्र तयार झाल्यानंतर या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोपे होईल.
कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे सुद्धा होतात, ज्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात.
ओळखपत्र बनल्यानंतर अशा लोकांची भीती शेतकर्‍यांना राहणार नाही.
शेतकर्‍यांना शेती संबंधी अनेक प्रकारची माहिती सुद्धा याच माध्यमातून देता येईल.
डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल.

 

Web Title :- Farmers Unique ID | Modi government creating unique ids of farmers enrolled under agri schemes says minister tomar

 

हे देखील वाचा :

OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

Udayanraje Bhonsle | भाजप खा. उदयनराजे यांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Home Loan Tax Deduction | मार्च 2022 पर्यंत होमलोनवर मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सवलत, जाणून घ्या कशी

 

Related Posts