IMPIMP

Satara News : 2 परदेशी आरोपींचा जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, पोलिसांनाही केली मारहाण

by sikandershaikh
satara-jail

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Satara News | 2 परदेशी आरोपींनी साताऱ्यातील जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. इतकंच नाही तर या आरोपींनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याचं समजत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यातील वाई इथं रो हाऊसमधील कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्या प्रकरणी 2 परदेशी आरोपींना अटक करण्यात आली होती. जर्मनी येथील सर्गीस व्हिक्टर मानका, सेबेस्टीन स्टेन मुलर असं या दोघांची नाव आहेत.

या दोघांनाही सातारा जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अचानक सर्गीस व्हिक्टर मानका आणि सेबेस्टीन स्टेन मुलर यांनी दोघांनी कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. दोघांनी विवस्त्र होत कारागृहातील स्वच्छतागृहांचे दरवाजे तोडले.

यानंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दोघांना आवरण्यासाठी धाव घेतली. परंतु धिंगाणा करण्यापासून रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण केली.

सदर दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
परंतु याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Related Posts