IMPIMP

राज्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्‍नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

by Team Deccan Express
former minister laxman dhoble's wife anuradha dhoble passed away

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे anuradha dhoble यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अनुराधा ढोबळे यांनी पुणे येथील एका रुग्णालयात आज (मंगळवार) पहाटे अखेरचा श्वास घेतला.

अनुराधा ढोबळे anuradha dhoble यांनी हुलजती जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्या ‘सावली’ वुमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षाही होत्या. त्यांच्या मागे पती लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन अभिजीत ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अनुराधा या अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने शाहू परिवार व महात्मा फुले सूत गिरणी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अनुराधा ढोबळे anuradha dhoble यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी त्यांनी प्रयत्न केले. महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून सुमारे दहा हजार महिलांना पोस्टाची बचत खाते काढून देण्याचे काम केले. त्या शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शकही होत्या. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांवरील सांसारिक तणाव कमी करावा यासाठी विविध उपक्रम राबविले होते.

Also Read :

Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’

…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

Related Posts