IMPIMP

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

by nagesh
Girish Mahajan | need to investigate eknath khadse son death whether it was murder or suicide says girish mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार (NCP MLA) आणि नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसेंना खूप वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री (CM) व्हावे, पण जनतेला नाही वाटत ना! असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच खडसे यांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. भाजप (BJP) हा केवळ वाणी आणि ब्राह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा म्हणजे बहुजनांचा पक्ष आहे, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन (Girish Mahajan) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे बरोबर बोलत आहेत. आमचा पक्ष वाणी आणि ब्राह्मणांचा पक्ष आहे, असे कोण म्हणतो? आमचा पक्ष मुळातच बहुजनांचा पक्ष आहे. आमच्याकडे 105 आमदार आहेत. आमच्याकडे मोठ्या संख्येने खासदार आहेत. आमचे सर्व लोकप्रतिनीधी बहुजनांचे प्रतिनिधित्व करतात. त्यात कुठेही ब्राम्हण आणि वाणी समाज नाही. त्यामुळे माणूस हा फक्त जातीने आणि समाजाने मोठा होत नाही, असे महाजन (Girish Mahajan) खडसेंना म्हणाले.

 

माणूस हा केवळ जात आणि धर्मामुळे मोठा होत नाही. तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो.
माणूस त्याच्या नेतृत्व क्षमतेमुळे मोठा होतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची क्षमता काय आहे,
हे अवघा महाराष्ट्र सांगेल. त्यामुळे एकनाथ खडसेंना लाख वाटत असेल की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे,
पण जनतेला वाटायला पाहिजे. खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे,
असे देखील गिरीश महाजन म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत होते.

 

 

Web Title :-  Girish Mahajan | bjp girish mahajan slams ncp eknath khadse over his statement

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics | कोकणातील शिवसेनेचे ‘हे’ माजी आमदार करणार भाजपामध्ये प्रवेश, सेनेला आणखी एक धक्का

Firing In Islampur | इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार

 

Related Posts