IMPIMP

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

by nagesh
Eknath Khadse On the same day Rashmi Shukla went to Fadnavis's bungalow, she got a clean cheat, Eknath Khadse's secret blast

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) आणि
ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना क्लीन चीट मिळाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकनाथ
खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्या दिवशी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना
भेटल्या, त्याच दिवशी त्यांची या प्रकरणातून सुटका होणार हे नक्की झाले होते. त्यानुसार त्या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेल्या आणि त्यांना क्लीन
चीट मिळाली, असा मोठा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले, तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. यासंदर्भात मुंबई पोलिसांत (Mumbai Police) तक्रार दाखल आहे. मात्र, फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला, याचे उत्तर मला अद्यापही कळू शकले नाही, असे खडसे म्हणाले. त्याचबरोबर मी अंडरवर्ल्डच्या बाबतीत ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडला होता, त्यावेळी मला पाकिस्तान (Pakistan), सौदी अरेबिया (Saudi Arabia) या देशांतून फोन आले. त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या (Threats to Kill) दिल्या. त्यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली होती. मला संरक्षण देखील दिले होते, असे देखील खडसे यांनी सांगितले.

 

पण काही काळानंतर त्यांनी माझे संरक्षण काढून घेतले. त्याचे कारण त्यांनी मला सांगितले नाही. ज्याप्रकारे माझे संरक्षण काढून घेण्यात आले, तसेच 50 खोके ज्यांनी घेतले आहेत, त्यांचे संरक्षण कधी काढून घेणार, असा प्रश्न उपस्थित करत खडसे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

 

सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो, त्याच्या गळ्याभोवती फास आवळला जातो.
त्याला नाउम्मेद केले जाते, अशीच सरकारची भूमिका आहे.
तसेच एखादा गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी जर रात्रभर पोलीस स्थानकात झोपावे लागत असेल,
तर जनसामान्यांचे प्रश्न कसे सुटणार, असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse On the same day Rashmi Shukla went to Fadnavis’s bungalow, she got a clean cheat, Eknath Khadse’s secret blast

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | कोकणातील शिवसेनेचे ‘हे’ माजी आमदार करणार भाजपामध्ये प्रवेश, सेनेला आणखी एक धक्का

Firing In Islampur | इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार

Chitra Wagh | भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर बोचरी टीका, जंतराव…निदान न कळणारी लबाडी तरी करा

Nashik CBI ACB Trap | 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना लष्करातील दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

 

Related Posts