IMPIMP

Girish Mahajan | एकनाथ खडसेंच्या BJP प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले – मी, फडणवीस, खडसे एकत्र…

by nagesh
Girish Mahajan | need to investigate eknath khadse son death whether it was murder or suicide says girish mahajan

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – Girish Mahajan | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या स्नूषा भाजपा खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. यानंतर खडसे पुन्हा भाजपामध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर स्वत: खडसे यांनी स्पष्टीकरणे देत विषयाला पूर्णविराम दिला होता. मात्र, आता भाजपाचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकमधील एका कार्यक्रमात खडसे आमच्यासोबत होते. भाषण संपल्यानंतर जेव्हा मी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खडसे एकत्र होतो तेव्हा जे असेल ते एकत्र बसून मिटवून टाकू असे ते म्हणाले. त्यांच्या मनात नेमकं काय मिटवायचं हे कळालं नाही. बसल्यावर काय मनात आहे माहिती नाही. त्यावेळी गडबडीत पुढे विचारायचं राहिलं. आपण यावर विचार करू असं ते म्हणाले.

 

महाजन (Girish Mahajan) यांनी खडसे यांची खिल्ली उडवताना म्हटले की, अमित शाह यांना दिल्लीला एकनाथ खडसे भेटायला गेले असताना कार्यालयाबाहेर 3 तास बसल्याचं मला खासदार रक्षा खडसेंकडून कळालं. अमित शाह यांनी भेटीची वेळ दिली नाही. भेटायला नकार दिल्याचं कळालं. खडसेंच्या मनात काय माहिती नाही.
40 वर्ष सगळं देऊनही खडसेंची भाजपात घुसमट होत होती आता 1 वर्षात तिकडे घुसमट व्हायला लागली.
एकनाथ खडसेंनी सबुरीने घ्यायला हवं. श्रद्धा आणि सबुरीने वागलं तर निश्चित त्या पक्षात फळ मिळेल.

 

दरम्यान, एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना खडसे म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान आहेत.
अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये असा नियम आहेत का?
विरोधक गोधडीत असल्यापासून मोदी-शाह यांच्यासोबत माझे संबंध आहेत.
मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे.
देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Girish Mahajan | bjp leader minister girish mahajan targeted to ncp mlc eknath khadse

 

हे देखील वाचा :

Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक

Pune Crime | सिक्युरिटी गार्डनेच केली सोसायटीच्या सभासदाला मारहाण; पिसोळी येथील घटना

Pune Crime | हॉटेल मॅनेजरने घातला साडेतीन लाखांना गंडा; मंगळवार पेठेतील प्रकार

 

Related Posts