IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 2 february 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज (Gold Price Today) 22 नोव्हेंबर 2021 ला वाढ नोंदली गेली. चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा वाढ झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,852 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 64,246 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा आज सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 17 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी नोंदली गेली. यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,869 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि तो 1,846 डॉलर प्रति औंसवर पोहचला. याशिवाय फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी रुपया अमेरिकन चलन, डॉलरच्या तुलनेत 10 पैसे कमी होऊन 74.40 च्या स्तरावर व्यवहार करत होता. (Gold Price Today)

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

चांदीच्या दरात आज उसळी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 444 रुपयांच्या तेजीसह 64,690 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 24.85 डॉलर प्रति औंसवर स्थित होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
आज कॉमेक्स (COMEX) वर सोन्याचा हाजीर भाव (Spot Gold Prices) मजबूतीने स्थिर राहिला.
यामुळे भारतीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात किरकोळ तेजी नोंदली गेली.
सोबतच डॉलरमध्ये मजबूती आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये मजबूतीमुळे सोन्याच्या दरावर दबाव आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today jumps and silver increase check update gold rates

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पीएमटी बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारा चोरटा गजाआड, 4 गुन्हे उघड

TET Exam 2021 | TET परीक्षेस 90 टक्के उमेदवारांची उपस्थिती; 8 हजार विद्यार्थी ‘डुप्लिकेट’?

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’

 

Related Posts