IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

by Team Deccan Express
gold rate today gold and silver price in pune mumbai nashik nagpur maharashtra india on 30 june 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,560 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,200 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे.

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,830 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,560 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,790 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,830 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,830 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,200 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price partially rises find out today rate in maharashtra mumbai pune nagpur nashik

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts