IMPIMP

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाली आहे. सध्याही सोन्या-चांदीचा भाव हा कमीच आहे. आजही (गुरूवारी) सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,010 रुपये पर्यंत आहे. तर चांदीची किंमत 62,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर उतरताना दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर 50 हजाराच्या वर होता. यंदा सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

 

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,880 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,010 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,010 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,010 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,010 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,500 रुपये (प्रति किलो).

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 30 december 2021

 

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक ! आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत

MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…’

 

Related Posts