IMPIMP

Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

by nagesh
Gram Panchayat Election Result 2022 | gram panchayat election stone pelting by defeated group in jalgaon death of bjp worker

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल (Gram Panchayat Election Result 2022) लागत आहेत.
स्थानिक पातळीवर पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीत सगळेच राजकीय पक्ष आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्न करत असतात. गावगाड्याच्या राजकारणात
ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election Result 2022) ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. त्यात विविध गटांमध्ये वाद झालेले देखील
पहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडला आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत एका
भाजप कार्यकर्त्याने आपला जीव गमावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जळगाव येथील जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात विजयी मिरवणूक सुरू असताना झालेल्या वादातून एका कार्यकर्त्याचा मृत्यु झाला. धनराज माळी असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता होता. राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निकालात बहुतांश ठिकाणी भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये देखील भाजपचेच वर्चस्व पहायला मिळत आहे.

 

यादरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीची देखील निवडणूक होती. या निवडणूकीत दोन्हीकडून भाजपचेच कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे होते. यात परिवर्तन पॅनलचा विजय झाला. त्यानंतर या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची मिरवणूक सुरू असताना अचानक एका ठिकाणी दगडफेक झाली. या घटनेत धनराज माळी हा गंभीर जखमी झाला. जखमी धनराजला जामनेर येथील रूग्णालयात हलवले असता वाटेतच त्याचा मृत्यु झाला.

 

या घटनेनंतर टाकळी खुर्द येथे तणावपूर्ण वातावरण झालेले पहायला मिळाले.
तसेच गावकऱ्यांनी या घटनेनंतर प्रचंड आक्रोश केला.
त्यानंतर सबंध जामनेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेतील २०-२५ संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच तणावाच्या पार्श्वभूमीवर टाकळी खुर्द या गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gram Panchayat Election Result 2022 | gram panchayat election stone pelting by defeated group in jalgaon death of bjp worker

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…

Winter Session -2022 | ‘कोयता गँग’मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा, पुणे शहर व परिसरातील ‘कोयता गँग’च्या गुंडांची दहशत रोखा; अजित पवारांची सभागृहात मागणी

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नावर जयंत पाटलांचे कर्नाटक सरकारला खडे बोल; म्हणाले…

 

 

Related Posts