IMPIMP

Winter Session -2022 | ‘कोयता गँग’मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा, पुणे शहर व परिसरातील ‘कोयता गँग’च्या गुंडांची दहशत रोखा; अजित पवारांची सभागृहात मागणी

by nagesh
Ajit Pawar | ajit pawars reaction regarding mahavikas aghadi

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Winter Session -2022 | पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत दिवसेंदिवस (Pune Crime) वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते, राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का ((MCOCA Action) Mokka) लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात (Winter Session -2022) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधीमंडळ अधिवेशनाच्या (Winter Session -2022) दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

 

पुणे शहर व आसपासच्या उपनगरात ‘कोयता गँग’ची दहशत आहे. पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गॅगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातल्या अनेक शहरात व उपनगरात हीच परिस्थिती आहे. कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत आहे. या गँगकडून रस्त्यावर कोयते परजत दहशत निर्माण केली जात आहे. दहशतीच्या जोरावर ‘कोयता गँग’चे गुंड वर्चस्व निर्माण करत आहेत.

 

कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा सुद्धा गंभीर मुद्दा आहे.
हे तरुण रात्री-अपरात्री रस्त्यावर हवेत कोयते परजत फिरतात. चोऱ्या करतात.
महिलांचे दागिने लुटतात, ज्येष्ठ नागरीकांना लुटतात, हॉटेलमध्ये जेवण करुन बीलाचे पैसे न देता हॉटेल
चालकांना मारहाण करतात, गाड्यांच्या काचा फोडतात. असे प्रकार वारंवार घडत आहेत.
यामुळे राज्यात भितीचे वातावरण आहे असेही अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Winter Session -2022 | The inclusion of minors in ‘Koyta Gang’ is a serious issue, stop the terror of ‘Koyta Gang’ gangsters in Pune city and its surroundings; Ajit Pawar’s demand in the House

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नावर जयंत पाटलांचे कर्नाटक सरकारला खडे बोल; म्हणाले…

Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे निधन

Winter Session 2022 | महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्याचे कारण काय? म्हणत विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…

Winter Session -2022 | कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले- ‘हे बरोबर नाही’

 

Related Posts