IMPIMP

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांचे शिंदे गटाला उघडे पाडणारे वक्तव्य, म्हणाले – ‘अपने को क्या करना है तीर-कमान से, बालासाहाब से, अपना…’

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

सिल्लोड : सरकारसत्ता ऑनलाइन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारावर आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर (Dhanushyaban Symbol) हक्क सांगणार्‍या शिंदे गटाला उघडे पाडणारे वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून येतो. आपल्याला बाळासाहेबांचे काय करायचे आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा विचार करुन मुस्लीम मतदार मला मतदान करतात, असे पाटील (Gulabrao Patil) यांनी म्हटले. ते सिल्लोडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाषणात म्हटले की, मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथे 90 टक्के मुस्लिम मला मते देतात. ते म्हणतात, अपने को क्या करना है तीर कमान से, बालासाहाब से, शरद पवार (Sharad Pawar) से, सोनिया गांधी (Sonia Gandhi) से अपना गुलाबरावही सब है.

 

शिवसेनेवर टीका करताना गुलाबराव म्हणाले, 3 लाख 80 हजार मतांचा मतदारसंघ आहे. तुम्ही दिसायलाही वाईट नाहीत फार छान दिसता. एकाने विचारले लोक तुम्हाला का निवडून देतात? कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेले असो पण 50 टक्के हे उमेदवारावरही अवलंबून असते, असे पाटील म्हणाले.

 

शिंदे गटाने (Shinde Group) केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)
यांनी अनेकदा गुलाबराव पाटील हे पानटपरी चालवायचे असा उल्लेख केला होता.
पानटपरी चालवायचा त्याला आम्ही आमदार केले, या शिवसेनेने केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gulabrao Patil | cm shinde supporter gulabrao patil says people vote for candidate mentions balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव

Nitesh Rane | भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नितेश राणे म्हणाले- ‘….तर अशी प्रतिक्रिया मिळणारच’

Maharashtra Politics | मुंबईतील नाराज भाजपा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, मित्रपक्षाला दिला धक्का! अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

 

Related Posts