IMPIMP

Shahaji Bapu Patil | मला विधानपरिषदेवर पाठवा, या विधानावरुन शहाजी पाटलांचे घुमजाव

by nagesh
Shahaji Bapu Patil | dont take that statement of mine seriously mla shahaji bapu patils retort within a few days

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  सूरतमध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडासोबत आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) देखील गेले होते. तिथून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला तिकडची मजा कथन करताना, काय झाडी, डोंगार, काय हाटेल.. ओकेमध्ये सगळं असे म्हंटले होते. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. त्यानंतर ते राजकारणात देखील सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी आपल्या एका विधानावरुन तोंड फिरवले आहे. शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी आपल्या विधान सहजतेने घ्या, म्हंटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मला विधान परिषदेवर पाठवा आणि अभिजीत पाटील (Abhijit Patil) याला आमदार करा, असे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले होते. गुरसाळे येथे श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पाटील बोलत होते. विधान परिषदेची मागणी केल्यामुळे पाटलांनी विधानसभेच्या राजकारणातून काढता पाय घेतला की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर पाटलांना स्पष्टीकरण द्यावे लागले.

 

तो विषय सहज घेण्याचा आहे. त्याला गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही.
अभिजीत पाटील हा नात्याने माझा भाचा आहे. एवढ्या तरुण वयात तो चार ते पाच साखर कारखाने चालवतो.
त्यामुळे एवढा कर्तुत्वान तरुण मी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिला नाही. त्याला उत्साह येण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी मी हे व्यक्तीगत विधान केले होते. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असे पाटील म्हणाले.

 

सांगोला विधानसभा मतदार संघातून (Sangola Assembly Constituency)
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला विधानपरिषदेवर
पाठवा, अशी मागणी पाटील यांनी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे केली.
अभिजीतला सांगोल्यातून विधानपरिषदेचे तिकीट द्या अशी जाहीर मागणीच पाटलांनी केल्याने चर्चांना उधाण आले होते.
अखेर त्यांना सारवासारव करत घुमजाव केले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shahaji Bapu Patil | dont take that statement of mine seriously mla shahaji bapu patils retort within a few days

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नितेश राणे म्हणाले- ‘….तर अशी प्रतिक्रिया मिळणारच’

Maharashtra Politics | मुंबईतील नाराज भाजपा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, मित्रपक्षाला दिला धक्का! अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

 

Related Posts