IMPIMP

Nitesh Rane | भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नितेश राणे म्हणाले- ‘….तर अशी प्रतिक्रिया मिळणारच’

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar
Jadhav) यांच्या चिपळूण येथील घरावर बुधवारी (दि. 19) मध्यरात्री हल्ला (Attack) करण्यात आला. यावेळी त्यांच्या घरावर पेट्रोलच्या बॉटल आणि
दगड फेकले गेले. त्यावर भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या विरोधात बोलणार असाल, तर
आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

 

तुम्ही अशा रितीने राणेंच्या विरोधात बोलणार असाल, तर आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाही. महाराष्ट्रात राणेंना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे आम्ही कुठवर शांत बसणार आहोत, असे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हंटले. हल्ला नेमका कुणी केला हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलीस ते करत आहेत. पण आमच्या विरोधात अशी रितीने बोलल्यावर प्रत्युत्तर मिळणारच, असे देखील राणे यांनी म्हंटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर पेट्रोलच्या बॉटल आणि दगडांनी हल्ला केला गेला.
काल मध्यरात्री (दि.19) त्यांच्या घरावर हल्ला झाला. तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी काल (दि. 18) कुडाळ तालुक्यात एक सभा झाली होती.
कुडाळचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ कुडाळ तालुक्यात एक विराट मोर्चा निघाला होता.
यावेळी भास्कर जाधव यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती.
नारायण राणेंना शिवसेना सोडून अठरा वर्षे झाली. पण त्यांना गेल्या अठरा वर्षात कोणी भाषणाला देखील बोलवत नाही.
त्यांना आणि त्यांच्या मुलांना गल्ली बोळातील कुत्री सुद्धा ओळखत नाहीत, असे भास्कर जाधव म्हणाले होते.
त्यावरुन हा वाद पेटला होता.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp nitesh rane reaction over attack on bhaskar jadhav house in chiplun

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | मुंबईतील नाराज भाजपा नेत्याचा शिंदे गटात प्रवेश, मित्रपक्षाला दिला धक्का! अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता

MLA Bachchu Kadu | आधी लोकांचे खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, बच्चू कडूंची नवनीत राणावर टीका

Maharashtra Police | मनसेचे गृहमंत्री फडणवीसांना पत्र, पोलिस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात, रोहयो मंत्री संदिपान भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू

 

Related Posts