IMPIMP

Gulabrao Patil | ‘दोघांची इच्छा आहे, पण अजून तिथी जवळ आलेली नाही’, अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचा मिश्कील टोला

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patil statement on ajit pawar bjp joinig rumor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडखोरी करुन भाजपसोबत (BJP) जाणार
असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर मंगळवारी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे सांगत
आपण राष्ट्रवादी मध्येच राहणार असल्याचे सांगितले होते. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मिश्किल टीप्पणी केली आहे. दोघांची
इच्छा आहे, पण गुण जुळत नसल्याचे ब्राह्मणाचं म्हणणं आहे, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जळुत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागते, हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करु नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळ लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणीही त्यांनी केली.

 

काय म्हणाले अजित पवार?

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार अल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल त्यांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा असेही अजित पवार यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Gulabrao Patil | gulabrao patil statement on ajit pawar bjp joinig rumor

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…’

MP Sanjay Raut | ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचे ऐकणार’, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – आळंदीत नेऊन लग्नाचा बनाव करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Kharghar Heat Stroke Case | उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंगलप्रभात लोढांनी दिली माहिती, म्हणाले- ‘यापुढे…’

 

Related Posts