IMPIMP

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

by nagesh
Hasan Mushrif | enforcement directorate raid ncp leader hasan mushrif home in kagal and pune

कोल्हापूर :  सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल (Kagal) आणि पुण्यातील (Pune) घरांवर ईडीने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आज (बुधवार) पहाटेच्या ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरु केली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर गर्दी केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

माजी नगरसेवक आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश गाडेकर (Prakash Gadekar) यांच्याही घरावर ईडीने छापा टाकला आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरी यापूर्वीही आयकर (Income Tax) आणि ईडीने छापे टाकले होते. त्यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी तक्रारी केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यातील मालमत्तांवर छापेमारी

ईडीने बुधवारी सकाळी मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापे टाकले.
पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर देखील ईडीने छापे टाकले आहेत.

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते.
2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रा. लि.
(BRICS India Pvt. Ltd.) कंपनीला चालवण्यास दिला.
या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केली होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hasan Mushrif | enforcement directorate raid ncp leader hasan mushrif home in kagal and pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

Pune Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा ब्रेक फेल, कार आणि ट्रकला धडक; रस्ता दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी
Punit Balan Celebrity League (PBCL) | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार, दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेचे १२ जानेवारी पासून आयोजन

 

Related Posts