IMPIMP

Imtiaz Jaleel | ‘उद्धव ठाकरेंचा ’तो’ खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता‘ – इम्तियाज जलील

by nagesh
Imtiaz Jaleel | shivsena chief uddhav thackeray government was thinking that aurangabad to sambhajinagar decision maybe would save their cm chair slams aimim imtiaz jaleel

औरंगाबाद :  सरकारसत्ता ऑनलाइनऔरंगाबादचे (Aurangabad) नामांतर संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याच्या प्रस्तावाला ठाकरे सरकारने (Thackeray Government) जाता-जाता मंजूरी दिल्याने अबू आझमी (Abu Azmi) आणि एमआयएमचे खासदार (MIM MP) इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) नाराज झाले आहेत. त्यांची ही खदखद त्यांनी बोलून दाखवण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच सभागृहात अबू आझमी यांनी यावर भाष्य केले होते. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उघडपणे औरंगाजेबाचे नाव कायम ठेवण्यासाठी तोंड उघडले आहे, यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ठाकरे सरकारच्या औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराच्या निर्णयावर (Rename Decision) टिका करताना म्हटले की, औरंगाबादचे घाईघाईत नामकरण करण्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्यावेळी त्या नामकरणामागे संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबाबतचे प्रेम नव्हते. स्वत:ची सत्तेची खुर्ची वाचवणे हे त्या निर्णयामागचे खरे कारण होते.

 

जलील पुढे म्हणाले की, ठाकरे यांची सत्ता जात असताना कदाचित या नामकरणाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचेल असा हा त्यांचा प्रयत्न होता. कोणत्याही जाती-धर्माचे लोक हे औरंगाबाद या नावाशी संबंध जोडत होते. कोणीही या शहराचे नाव बदलण्याची मागणी करत नव्हते. आतादेखील आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ. आम्ही आंदोलनं करू, कोर्टाकडे दाद मागू आणि संसदेत देखील आवाज उठवू, असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून शिवसैनिकांना आणि जनतेला भावनिक आवाहन केले होते.
यावर अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाचे कौतूक केले होते. यामध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचाही समावेश होतो.
जलील यांनी या संदर्भात एक ट्विट केले होते, ज्यात म्हटल होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणा मला खूपच भावला.
आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण ऐकून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते.
व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला. तुमच्या पक्षातील सर्व बंडखोरांना तुम्ही तुमच्या नम्रपणे चपराक लगावली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Imtiaz Jaleel | shivsena chief uddhav thackeray government was thinking that aurangabad to sambhajinagar decision maybe would save their cm chair slams aimim imtiaz jaleel

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर…’ – CM एकनाथ शिंदे

Maharashtra Politics | राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर बंडखोर आमदार ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

 

Related Posts