IMPIMP

Indian Railways | तुमच्या ट्रेन तिकिटावर इतर कुणीही व्यक्ती करू शकतो प्रवास ! रेल्वेने दिली सुविधा, जाणून घ्या कशी?

by nagesh
Indian Railways | 12 ticket booking per month new rule app irctc

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाIndian Railways | जर तुमच्याकडे ट्रेनचे कन्फर्म रिझर्व्हेशन तिकीट (Train Confirm Ticket) असेल, पण तुम्ही काही कारणास्तव प्रवास करू शकत नसाल, तर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. कारण तुम्ही हे तिकिट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. रेल्वेने ही विशेष सुविधा दिली आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) या विशेष सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता ते जाणून घेवूयात (How to Transfer Train Ticket?)…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सुविधा
रेल्वे प्रवाशांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो की तिकीट बुक केल्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत एकतर त्यांना तिकीट रद्द करावे लागते आणि त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीचे नवीन तिकीट घ्यावे लागते.

पण नंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते. त्यामुळेच रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. जरी ही सुविधा बर्‍याच काळापासून अस्तित्वात असली तरी लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता ते आम्ही सांगणार आहोत. (Indian Railways)

 

तिकीट कुटुंबातील सदस्यांना करा ट्रान्सफर
एक प्रवासी त्याचे कन्फर्म झालेले तिकीट त्याच्या कुटुंबातील वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. यानंतर, तिकिटावरील प्रवाशाचे नाव काढून टाकले जाते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले गेले आहे त्याचे नाव टाकले जाते.

 

24 तास अगोदर द्यावा लागेल अर्ज
जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि त्याच्या ड्युटीसाठी जात असेल तर तो ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करू शकतो, ज्या व्यक्तीसाठी विनंती केली आहे त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल. लग्नाला जाणार्‍या लोकांसमोर अशी परिस्थिती आल्यास लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास आधी अर्ज करावा लागतो. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता. ही सुविधा NCC कॅडेट्ससाठीही उपलब्ध आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फक्त एकदा मिळते संधी
भारतीय रेल्वेनुसार, तिकिटांचे हस्तांतरण फक्त एकदाच केले जाऊ शकते, म्हणजे, जर प्रवाशाने त्याचे तिकीट इतर व्यक्तीला एकदा हस्तांतरित केले असेल तर तो ते पुन्हा बदलू शकत नाही. म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही.

 

असे ट्रान्सफर करा Train Ticket

1. तिकिटाची प्रिंट काढा.

2. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरला भेट द्या.

3. ज्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे, त्याचे ओळखपत्र जसे की आधार किंवा मतदान ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.

4. काउंटरवर तिकीट हस्तांतरणासाठी अर्ज करा.

 

Web Title :- Indian Railways | you can transfer your confirm train ticket to family members if know here how indian railways update

 

हे देखील वाचा :

Numerology | अंकराशी 19 जानेवारी ! ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना दिवसभरात मिळतील अनेक संधी, विनकारण खर्च होईल पैसा

Nashik Crime | धक्कादायक ! बापानं लावलं पोरीला धंद्याला, नराधमाला 10 वर्षांची सक्तमजुरी

Punjab Assembly Election 2022 | पंजाब मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; आम आदमी पार्टीकडून ‘या’ नावाची घोषणा

 

Related Posts