IMPIMP

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”

by nagesh
Jacqueline Fernandez | why havent you arrested jacqueline fernandez why adopt pick and choose policy delhi court to ed

सरकारसत्ता ऑनलाईन – Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग (Money Laundring) प्रकरणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही तिच्या नियमित जामीन याचिकेवरील सुनावणीसाठी आज (10 नोव्हेंबर) पटियाला हाऊस कोर्टात (Patiala High Court) हजर झाली होती. या सुनावणी दरम्यान ईडीला न्यायालयाच्या काही प्रश्नांचा सामना करावा लागला. ‘एलओसी जारी करूनही तुम्ही जॅकलिनला (Jacqueline Fernandez) अद्याप अटक का केली नाही? इतर आरोपी तुरुंगात आहेत. तुम्ही या प्रकरणात निवडक लोकांना अटक का करत आहात?’ असा सवाल कोर्टाने ईडीला (ED) केला.

 

कोर्टाने जॅकलिनच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकला. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिसने ईडीवर (ED) काही आरोप केले आहेत. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे जॅकलिननं सांगितले. ती म्हणाली, मी माझ्या कामानिमित्त परदेशात जाते, पण मला परदेशात जाण्यासाठी आडवण्यात आलं. मी गेल्या वर्षी जानेवारीत आईला भेटायला जाणार होते. पण मला जाऊ दिले नाही. एवढेच नाही तर जॅकलीनने न्यायालयात सांगितले की, तिने याबाबत तपास यंत्रणेला मेलही केला होता, मात्र ईडीकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत यांच्या जामीनानंतर ईडी आणि इतर केंद्रीय संस्था पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
केंद्र सरकार या संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत आहेत.
अशा वेळी कोर्टाने केलीली टीका अधिक लक्षवेधक ठरत आहे.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | why havent you arrested jacqueline fernandez why adopt pick and choose policy delhi court to ed

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पोलीस महिलेच्या पतीनेचे केले 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पती अटकेत

Sharad Ponkshe | शरद पोंक्षेंची संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह टीका

Bachchu Kadu | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अपंगांचे नाथ”; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यासाठी गौरोद्गार

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

 

Related Posts