IMPIMP

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – Jalgaon ACB Trap | 25 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसिलदारासह कोतवालास अटक केली आहे (Jalgaon Bribe Case). ही कारवाई गुरूवारी (दि. 16) करण्यात आली आहे. (Jalgaon ACB Trap)

 

नायब तहसिलदार जयवंत पुंडलीक भट Jaywant Pundalik Bhat (51, तहसिल कार्यालय, धरणगाव, ता. धरणगाव – Dharangaon, जि. जळगाव) आणि कोतवाल राहुल नवल शिरोळे Rahul Naval Shirole (30, पाळधी तलाठी कार्यालय, ता. धरणगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या भावाचे दोन ढंपर वाहन असुन ते ढंपरव्दारे वाळु वाहतुकीचा व्यवसाय करतात. 2 ढंपरपैकी एक ढंपर हे एरंडोल तहसिल कार्यालय (Erandol Tehsil Office) येथे जमा आहे. यापुर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून दि. 1 मार्च 2023 रोजी 30 हजार रूपये आणि दि. 11 मार्च 2023 रोजी 23 हजार रूपये नायब तहसिलदार जयवंत भट यांनी जागेवरच घेतलेले आहेत. त्यानंतर नायब तहसिलदार जयवंत भट यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी कोतवाल राहुल शिरोळे यांची भेट घेतली. (Jalgaon ACB Trap)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तक्रारदार यांनी एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व दुसरे वाळू वाहतुक सुरू असलेले ढंपर
असे तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव हद्दीमधुन वाळू वाहतूकीचा व्यवसाय कारवाई न करता चालु देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष प्रत्येकी ढंपरचे 15 हजार रूपये असे 30 हजार रूपये मागुन तडजोडीअंती 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तसेच कोतवाल शिरोळे यांनी त्यांच्या मोबाईलवरून नायब तहसिलदार भट यांच्याशी बोलणी करवून दिली. त्यानंतर शिरोळे यांनी 25 हजार रूपयाची लाच पंचासमक्ष घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले तर जयवंत भट यांना धरणगाव तहसिल कार्यालय येथून ताब्यात घेण्यात आले आहे. धरणगाव पोलिस ठाण्यात (Dharangaon Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Sharmishtha Gharge-Walawalkar),
अप्पर अधीक्षक एन.एम. न्याहळदे, उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या
मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक शशिकांत पाटील (DySP Shashikant Patil), पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव
(PI N.N. Jadhav), एस.के. बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे,
कर्मचारी राकेश दुसाने, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, कर्मचारी सुनिल पाटील, रविंद्र घुगे,
महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक किशोर महाजन, सुनिल वानखेडे, कर्मचारी ईश्वर धनगर, सचिन चाटे,
प्रदिप पोळ, प्रणेश ठाकुर आणि अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | Kotwal with Naib Tehsildar in anti-corruption net in 25 thousand bribe case Dharangaon Jalgaon Bribe ACB Trap

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Devendra Fadnavis | ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

MP Supriya Sule | राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी; खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा

 

Related Posts