IMPIMP

Jalgaon Crime News | रंग आणण्यासाठी गेलेल्या 2 जिवलग मित्रांवर काळाची झडप; जळगावमधील घटना

by nagesh
Jalgaon Crime News | two friends died in a terrible accident dumper and two wheeler on the jalgaon yaval highway

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन- Jalgaon Crime News | जळगावमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कलर आणण्यासाठी जळगावहून यावलकडे जात असलेल्या दोन मित्रांवर काळाने झडप टाकली आहे. एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ घडला आहे. अमोल राजेंद्र पाटील (वय 28, रा. सुप्रिम कॉलनी) याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात जखमी असलेल्या इस्माईल हबीब तडवी (वय 30, रा. सावखेडा सीम) याचाही रात्री साडेबारा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जिवलग मित्रांचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalgaon Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण घटना ?

जळगावातील सुप्रिम कॉलनी येथे अमोल पाटील हा कुटुंबासह राहतो. शुक्रवारी सायंकाळी अमोल हा त्याचा सावखेडा सीम येथील मित्र इस्माईल हबीब तडवी याच्यासोबत एमएच 19 डीबी 2746 या क्रमाकांच्या दुचाकीने कलर घेण्यासाठी यावल येथे जात होते. यादरम्यान यावल तालुक्यातील डांभूर्णी गावाजवळील कोळन्हावी फाट्याजवळ एमएच 19 बीडी 3468 या क्रमाकांच्या डंपरने अमोलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर इस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचादेखील उपचारदरम्यान मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)

 

अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून फरार झाला. या प्रकरणी मयत अमोलचे काका राजू शामराव पाटील
यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमएच 19 बीडी 3468 या क्रमाकांच्या डंपरवरील चालकाविरोधात यावल पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोलच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे.
आपल्या एकुलत्या एका मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने राजेंद्र पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर
दु:खांचा डोंगर कोसळला आहे. तर इस्माईल हबीब तडवी हा मोलमजुरी करून आपल्या कुंटुंबाचा उदरर्निवाह
करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन डंपर जप्त केला आहे. तसेच आरोपी डंपर चालकाचा शोध सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jalgaon Crime News | two friends died in a terrible accident dumper and two wheeler on the jalgaon yaval highway

 

हे देखील वाचा :

Amruta Khanvilkar | नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाली….

Sanjay Dutt And Manyata Dutt | पत्नी मान्यता बरोबर रोमँटिक डान्स केल्याने संजय दत्त झाला ट्रोल

Amrawati Crime News | बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू; अमरावतीमधील घटना

 

Related Posts