IMPIMP

Jayant Patil | ‘तुमचा फौजदाराचा हवालदार केला, आमची मापं काढू नका’, जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

by nagesh
Jayant Patil | jayant patil replied bjp dcm devendra fadnavis criticism on ncp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या
(Karnataka Assembly Elections) प्रचारसभांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
फडणवीस यांनी राष्ट्रवादीला (NCP) डिवचत टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर
दिले आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) फौजदाराचा हवालदार केला. आता त्यांनी आमची मापे काढावीत का, असा खोचक टोला जयंत पाटील (Jayant
Patil) यांनी लगावला आहे.

 

मी पुन्हा येणार म्हटले की येतोच, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीला डिवचत टीका केली. इथे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे.
मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) मिलीभगत आहे.
हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, अशा शब्दात सीमाभागातील निपाणीमध्ये फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला
होता. यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पलटवार केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जे कोणी राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, असे म्हणत असतील. त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केला आहे. आता त्यांनी आमची मापे काढावीत का, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. तसेच आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या झंझावातात 2024 ला राष्ट्रवादी महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होईल. हे तुम्हाला सक्षमपणाने सागतो, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिले.
आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे आणि कोण किती वस्ताद आहे,
या सगळ्या खोलात तिथे बोलायचे, इथे नाही,
असे म्हणत शरद पवारांनी फडणवीस यांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असे सांगितले.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil replied bjp dcm devendra fadnavis criticism on ncp

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

Pune PMC Employees – 7th Pay Commission | सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे महानगरपालिकेला निर्देश

Ajit Pawar | सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत, अजित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Palkhi Mahamarg | पालखी महामार्गावरील हडपसर ते झेंडेवाडी मार्गाची निविदा लवकर काढण्यासाठी आदेश द्यावेत; खासदार सुप्रिया सुळे यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

 

Related Posts