IMPIMP

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

by nagesh
Jitendra Awhad On Ramdev Baba | ncp leader jitendra awhad slams ramdev baba controversial statements about women

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – योगगुरु बाबा रामदेव यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहेत. त्यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On Ramdev Baba) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरली आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On Ramdev Baba) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रामदेव बाबा यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात महिलांच्या पोशाखावरुन वादग्रस्त भाष्य केले आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत बाबा रामदेव यांना फटकारले आहे.

 

“रामदेव बाबांना आई आहे … आणि ते ब्रम्हचारी
.. मग … मनात डोळ्यात विकृती …
मराठी साहित्यात परस्त्री माते समान…”
असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

 

 

योगगुरु बाबा रामदेव ठाण्यातील एका योग कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी बाबा रामदेव यांनी महिलांच्या पोशाखावर एक विधान केले. ‘महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात’, असे रामदेव बाबा म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jitendra Awhad On Ramdev Baba | ncp leader jitendra awhad slams ramdev baba controversial statements about women

 

हे देखील वाचा :

Pune Police | कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई; जाणून घ्या कारण

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; एमईएस क्रिकेट क्लब विजयाची हॅट्रीक

 

Related Posts