IMPIMP

Pune Police | कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई; जाणून घ्या कारण

by nagesh
Pune Crime News | Pune: Extortion demand of 30 lakhs from builder, case against three in Kondhwa police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Police | बोटावर मोजण्याइतक्या पोलिसांच्या लाचखोरीपणामुळे पुणे शहर पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यात एसबीची कारवाई झाल्यास त्या पोलीस ठाण्याच्या (Pune Police) वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात सलग दोन पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात’ अडकले आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांना 7 दिवसांसाठी नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. पोलीस आयुक्तांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने दोन लाखाची लाच मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध लुचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महिला सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. सलग दोन घटना घडल्यामुळे पोलीस आयुक्तांनी थेट वरिष्ठ निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune Police)

 

दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले होते. पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आयुक्तांनी ही कारवाई केली होती.. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची देखील कंट्रोल रूममध्ये बदली केली आहे.

 

कोंढवा पोलिस ठाण्यात गेल्या काही महिन्यात अ‍ॅन्टी करप्शनचे काही ट्रॅप झाले आहेत.
सतत अ‍ॅन्टी करप्शनचे ट्रॅप झाल्याने अखेर पोलिस आयुक्तांनी रूद्रावतार धारण करत
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांना 7 दिवसांसाठी नियंत्रण कक्षाशी सलग्न केले आहे.
आगामी काळात ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप होईल तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर
देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा देखील पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
दिला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Police | Action of Police Commissioner Amitabh Gupta, kondhwa sr pi Sardar Patil attached to Control room; Find out why

 

हे देखील वाचा :

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Pune Cyber Crime | ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पुनावालांना 1 कोटीचा गंडा ! पुणे पोलिसांची धडक कारवाई; वेगवेगळ्या राज्यातून 7 जणांना अटक, आरोपींमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियरचा समावेश

 

Related Posts