IMPIMP

Kharghar Heat Stroke Case | ‘खोके सरकार नक्की काय लपवतंय?’, व्हायरल व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंचा सवाल

by nagesh
Kharghar Heat Stroke Case | nana patole raised questions on 13 deaths in maharashtra bhushan ceremony

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन   Kharghar Heat Stroke Case | ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr.
Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील
खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर (Central Park Ground) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह
इतर राज्यातून अनेक जण आले होते. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागलं. उष्माघातामुळे (Kharghar Heat Stroke Case) 14 जणांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

42 अंश सेल्सिअस तापमानात श्री सेवक (Shree Sevak) या मैदानावर जमले होते. कडक उन्हात चार ते पाच तास बसल्यामुळे श्री सदस्यांना उष्माघाताची समस्या (Kharghar Heat Stroke Case) जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 14 जणांचा मृत्यू जाला. यानंतर विरोधी पक्षांनी (Opposition Parties) सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सरकाच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाले असल्याची शंका व्यक्त केली आहे. पटोले यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. तसेच गर्दीत काही लोक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. यासह रुग्णवाहिकेच्या (Ambulance) सायरनचा आवाजही ऐकायला येतोय. हा व्हिडिओ महाराष्ट्र भूषण कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतणाऱ्या गर्दी केलेल्या श्री सेवकांचा असल्याचा दावा केला जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

नाना पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर (State Government) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kharghar Heat Stroke Case | nana patole raised questions on 13 deaths in maharashtra bhushan ceremony

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | ‘दोघांची इच्छा आहे, पण अजून तिथी जवळ आलेली नाही’, अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेवर गुलाबराव पाटलांचा मिश्कील टोला

Maharashtra Political News | ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपचा संजय राऊतांवर निशाणा, म्हणाले-‘उद्धव ठाकरे…’

MP Sanjay Raut | ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचे ऐकणार’, अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

 

Related Posts