IMPIMP

Kieron Pollard IPL Retirement | कायरन पोलार्डची IPL मधून निवृत्ती; आता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पार पाडणार ‘ही’ जबाबदारी

by nagesh
kieron pollard announces retirement from playing ipl appointed as batting coach for mumbai indians cricket ipl 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Kieron Pollard IPL Retirement | आयपीएल 2023 (IPL 2023) साठी सगळ्या टीम्सनी संघ बांधणीला सुरुवात केली आहे. या सिझनसाठी सर्व संघानी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळडूंची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार ऑलराऊंडर कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतली आहे. पोलार्ड तब्बल 12 आयपीएल सिझन मुंबईकडून खेळला आहे. मुंबई हि आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मानली जाते. या टीमने आतापर्यंत पाच विजेतेपद पटकावले आहेत. या पाचही विजेतेपदामध्ये कायरन पोलार्डचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईमधून खेळणार नसला तरी तो मंबई इंडियन्सच्या संघात महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. (Kieron Pollard IPL Retirement)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईसोबत नातं कायम
पोलार्ड आयपीएल खेळणार नसला तरी त्यानं मुंबईसोबत नातं सोडलेलं नाही. तो आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा बॅटींग कोच (Batting coach) म्हणून काम पाहणार आहे. आयपीएलचा भक्कम अनुभव आणि जगभरातील टी20 लीगमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव पोलार्डकडे आहे. या सर्व अनुभवाच्या जोरावर तो मुंबईच्या नव्या खेळाडूंना बॅटींगचे धडे देणार आहे. यादरम्यान पोलार्डने एक इमोशनल पोस्ट (Emotional post) लिहून त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीची आणि नव्या भूमिकेची घोषणा केली.

पोलार्डची आयपीएल कारकीर्द
कायरन पोलार्डनं 2010 ते 2022 पर्यंत 189 आयपीएल सामने खेळले.
यामध्ये त्यानं 147.32 च्या स्ट्राईक रेटनं 3412 रन केले.
यामध्ये त्याने 16 हाफ सेंच्युरी केल्या आहेत. 87 हा त्याचा आयपीएलमधील सर्वोत्तम स्कोर आहे.
ऑलराऊंडर पोलार्डनं या कालावधीमध्ये 8.79 च्या इकोनॉमी रेटनं 69 विकेट्स घेतल्या.
44 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
मागच्या काही सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Roht Sharma) अनुपस्थित पोलार्डने मुंबईसंघाचे नेतृत्वदेखील केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- kieron pollard announces retirement from playing ipl appointed as batting coach for mumbai indians cricket ipl 2023

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | ‘शिवसेनेचे हिंदुत्व सोडलेले लोक आता भाजपकडून हिंदुत्वाचे धडे घेत आहेत’ – अंबादास दानवे

Pune Crime | …म्हणून मुलानं केलं आईसोबत भयंकर कृत्य; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे

 

Related Posts