IMPIMP

Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान

by nagesh
Kiff 2022 | west bengal cm mamata banerjee demanding bharatratna to actor amitabh bacchan

सरकारसत्ता ऑनलाईन – नुकताच कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Kiff 2022) सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवाला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील हजेरी लावली आहे. अमिताभ बच्चन यांनी आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकले आहेत. या महोत्सवाला (Kiff 2022) त्यांनी पत्नी जया बच्चन सोबत हजेरी लावली होती. तर या महोत्सवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या महोत्सवात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, “बंगालमधून अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गेली अनेक वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान दिले आहे. यासाठी ही मागणी आम्ही करणार आहे”. तर या महोत्सवाला (Kiff 2022) शाहरुख खान, शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

 

 

या सोहळ्याला अमिताभ बच्चन जया बच्चन सोबतच राणी मुखर्जी, अर्जित सिंग आदी मान्यवर मंडळी
उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाची सांगता 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Kiff 2022 | west bengal cm mamata banerjee demanding bharatratna to actor amitabh bacchan

 

हे देखील वाचा :

Solapur Band | आज सोलापूर बंद; महाविकास आघाडीचा पाठिंबा

Manoj Prabhakar | मनोज प्रभाकर यांचा नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Pune Crime | पुणे पोलिसांकडून मुलुंडमधील बनावट कॉल सेंटर उध्वस्त ! लोनच्या नावाने कोटयावधीची फसवणूक, 40 मोबाईल जप्त

 

 

Related Posts