IMPIMP

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी’ – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Kirit Somaiya on Uddhav Thackeray | भोंगा आणि हनुमान चालिसा या दोन विषयावरुन राज्यात मोठं वातावरण
तापलं आहे. यावरुन अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दिलेल्या इशा-
यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचंही दिसलं. यावरुन शिवसेना आणि मनसे (Shivsena And MNS) वाद वाढला. यामध्ये भाजपनेही (BJP)
उडी घेत सरकारला लक्ष्य केलं आहे. अशातच आता भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर
(Thackeray Government) निशाणा साधला आहे. (Kirit Somaiya on Uddhav Thackeray)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात हिंमत असेल, तर हनुमान चालिसा, रामभक्त हनुमंतांचे कीर्तन भजन बंद करून दाखवा,” असा थेट इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी दिल्लीत जाऊन राणा दाम्पत्याची भेट घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ”ठाकरे सरकारला कोर्टाच्या एवढ्या चपराक पडल्यात की, उद्धव ठाकरेंचे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असल्याचे,” सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya on Uddhav Thackeray)

 

 

पुढे सोमय्या म्हणाले, ”हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त आहोत. जेव्हा रावण जन्माला येतात, त्यांच्या लंकेला हनुमानच जाळून टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा, हनुमानाचे भजन-कीर्तन बंद करून दाखवावे,” असा इशाराच त्यांनी दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”ठाकरे सरकारने हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. 20 फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत,” असं सोमय्या म्हणाले.

 

 

Web Title : Kirit Somaiya on Uddhav Thackeray | bjp leader kirit somaiya criticised maha vikas aghadi and cm uddhav thackeray after meet navneet rana and ravi rana in delhi 

 

हे देखील वाचा :

IAS Pooja Singhal Suspended | वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल निलंबित

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील ग्रुप, न्युट्रिलिशियस् संघांचा सलग दुसरा विजय

Sun Melon Benefits | खरबूज ‘हे’ अद्भुत फळ, शरीराला हायड्रेटेड ठेवण्याबरोबरच केस गळणेही थांबतात

 

Related Posts