IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; नील सोमय्यांचा फैसला उद्या

by nagesh
Kirit Somaiya | pre arrest bail application of kirit somaiya rejected

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  Kirit Somaiya | आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी (INS Vikrant Fund Scam Case) भाजप नेते
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre – Arrest Bail Application) मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions
Court) फेटाळण्यात आला आहे. यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामीन
अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आज (सोमवारी) सकाळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद पूर्ण झाला. यानंतर सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने
फेटाळून लावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) विक्रांत फाईल्सवरुन गंभीर आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात (Trombay Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला होता.

 

दरम्यान, यानंतर सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. आता सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या आता उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, नील सोमय्या यांच्या अर्जावर उद्या कोर्ट निर्णय देणार असल्याचे वकील पावनी चड्डा (Lawyer Pawni Chadda) यांनी सांगितले.

 

Web Title :- Kirit Somaiya | pre arrest bail application of kirit somaiya rejected

 

हे देखील वाचा :

Pune Crime | क्राईम पेट्रोल मालिका बघून रचला कट, शितपेयातून महिलेला दिल्या झोपेच्या गोळ्या; खून करुन दागिने लुटणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 15 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक आणि खाजगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात, 2 दिवसांची पोलीस कोठडी

Katrina Kaif Airport Look | गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये कतरिनानं दाखवला देशी अंदाज, विमानतळावर बघताच नेटकरी झाले तिच्यावर फिदा

 

Related Posts