IMPIMP

KISAN Credit Card | किसान क्रेडिट कार्ड इमर्जन्सीसाठी देऊ शकते कर्ज, 5 वर्षापर्यंत कर्ज परतफेडीची मिळते सुविधा, जाणून घ्या मिळवण्याची पद्धत

by nagesh
Kisan Credit Card Loan Scheme | farmers will get credit cards from the central government for crop loans

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  किसान क्रेडिट कार्ड (KISAN Credit Card) द्वारे इमर्जन्सीसाठी कर्ज घेता येऊ शकते. लाभार्थीला ही आर्थिक मदत प्रामुख्याने शेतीच्या खर्चासाठी दिली जाते, तसेच कर्ज परतफेडीसाठी पाच वर्षांची सवलत मिळते. KISAN Credit Card बाबत महत्वाची माहिती जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही भारत सरकारची योजना आहे, जी शेतकर्‍यांना वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून देते.
ती 1998 मध्ये शेतकर्‍यांना अल्पकालिन औपचारिक कर्ज देण्याच्या हेतूने सुरू केली होती आणि नाबार्ड (राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक) द्वारे बनवण्यात आली होती.

 

केसीसी योजना (KISAN Credit Card) कृषी, मत्स्य पालन आणि पशुपालन क्षेत्रात शेतकर्‍यांच्या कर्जासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली.
केसीसीच्या मदतीने शेतकर्‍यांना बँकांद्वारे दिल्या जाणार्‍या नियमित जास्त व्याजदरात सूट दिली जाते.
कारण केसीसीसाठी व्याजदर दोन टक्केपेक्षा कमी आणि सरासरी चार टक्केपासून सुरू होतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किसान के्रडिट कार्ड (KISAN Credit Card) योजनेच्या लाभार्थ्यांना रूपे (RUPAY) कार्ड दिले जाते.
ते या स्कीम अंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर होतात.
माहितीनुसार, जर कुणी शेतकर्‍याने तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले तर त्यावर सात टक्के व्याजदर लागतो.
तर, तीन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जावर व्याजदर वेळोवेळी बदलत राहतो.

 

कोण घेऊ शकतात KCC

 

शेतकरी, मत्स्यपालन आणि पशुपालन करणार्‍या सर्व व्यक्ती, इतरांच्या जमीनीत शेती करत असणारे, लाभ घेऊ शकतात.
किमान वय 18 आणि कमाल 75 वर्ष असावे. शेतकर्‍याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर एक को-अ‍ॅपलीकंट सुद्धा लागेल.
ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. शेतकर्‍याने फॉर्म भरल्यानंतर बँक कर्मचारी पाहिल की, तुम्ही पात्र आहात की नाही.

 

KCC साठी आवश्यक कागदपत्र

 

आयडी प्रूफसाठी वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
तसचे, अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून वोटर ID card / पासपोर्ट/आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स पाहिले जाते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अशाप्रकारे करा ऑनलाइन अर्ज :

 

ज्या बँकेचे हे क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे, तिच्या वेबसाइटवर जा. तिथे किसान क्रेडिट कार्डचा पर्याय निवडा.
नंतर अप्लायवर क्लिक करा. अर्जाच्या पेजवर गेल्यावर ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे एक रेफरन्स नंबर येईल.
जर तुम्ही या क्रेडिट कार्डसाठी योग्य असाल तर बँक अधिकारी तुम्हाला दोन ते तीन दिवसात संपर्क करतील.
याशिवाय तुम्ही थेट बँकेत जाऊनही या स्कीमसाठी अर्ज करू शकता.

 

Web Title : KISAN Credit Card | kisan credit card can provide loan in emergency and facility to repay loan for five years know how to take it kcc news

 

हे देखील वाचा :

Diwali Shopping | गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्डब्रेक ! दिवाळीला 1.25 लाख कोटीच्या वस्तूंची विक्री; चीनचे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 661 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | राज्यात आगामी 3 दिवसांमध्ये वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा अंदाज, IMD नं दिला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

 

Related Posts