IMPIMP

Lok Sabha Election 2024 | भाजपकडून ‘मिशन 48’ ची घोषणा ! 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी

by nagesh
Lok Sabha Election 2024 | loksabha election 2024 bjp mission 48 seat announced devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Lok Sabha Election 2024 | राज्यसभा निवडणुकीत भाजपचा दमदार प्लॅन सक्सेस झाला असतानाच आता 20 जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीची (Maharashtra MLC Election-2022) आखणी करण्यास सुरूवात झाली आहे. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीचीही 2024 (Lok Sabha Election 2024) तयारी महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) आतापासूनच करत आहे. त्यामुळे ‘मिशन 48’ ची घोषणा केली आहे. आज झालेल्या भाजपच्या बैठकीदरम्यान याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024, BJP Announced Mission 48)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. तसेच, लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा.” असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

दरम्यान, आज झालेली बैठक लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात झाल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यामध्ये मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांचा समावेश असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं. त्याचबरोबर “आगामी 17 ते 18 महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलंय. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचंय. राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Lok Sabha Election 2024 | loksabha election 2024 bjp mission 48 seat announced devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Medium Spicy | मल्टीस्टारर “मीडियम स्पाइसी” मध्ये राधिका आपटेची धमाकेदार एंट्री

Business Idea | अतिशय कमी गुंतवणुकीत घराच्या छतावर सुरू करा हा बिझनेस, लाखो रूपयांची होईल कमाई

Share Market Crash | गुंतवणुकदारांचा आक्रोश ! मंदीची चाहूल लागल्याने शेयर बाजार क्रॅश, Sensex 1000 अंकापेक्षा जास्त कोसळला

Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्‍याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

 

Related Posts