IMPIMP

Love Jihad Law | महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद कायदा’ होणार? देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात मोठे विधान

by nagesh
Love Jihad Law | maharashtra assembly winter session devendra fadnavis on love jihaad shraddha walkar murder case

नागपूर: सरकारसत्ता ऑनलाईन  – दिल्लीत श्रद्धा वालकर या युवतीचा निर्घृण खून (Shraddha Walker Murder Case) झाल्यानंतर राज्यात ‘लव्ह जिहाद कायदा’ (Love Jihad Law) आणण्याची मागणी जोर धरत आहे. यावर आता विधींमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session -2022) बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. याबाबत अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मांडलेल्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद बाबत कायदा (Love Jihad Law) करण्याची राज्य सरकारची मानसिकता असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले अतुल भातखळकर?

श्रद्धा वालकर प्रकरणासारख्या अनेक घटना महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून समोर आल्या. त्यामुळे लव्ह जिहादला (Love Jihad Law) विरोध करणारा एखादा कायदा आपल्या राज्यात असायला हवा. तो कायदा करण्याबाबात राज्य सरकार विचार करत आहे का? श्रद्धा वालकर या युवतीने 2020 मध्ये नालासोपारा पोलिसांना (Nalasopara Police) एक तक्रार अर्ज दिला होता. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलिसांवर तत्कालीन सरकारच्या शीर्षस्थ नेत्यांचा राजकीय दबाव होता का? असे प्रश्न अतुल भातखळकरांनी विधानसभेत विचारले.

 

श्रद्धा वालकर प्रकरणात राजकीय दबाव नाही

अतुल भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नव्हता. आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. तिने परत घेतलेल्या तक्रारीची पोलीस चौकशी करत आहेत. यादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? तेव्हा जर तपास केला असता, तर हा प्रकार टाळता आला असता. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यापुढचा उपाय म्हणून सांगितले आहे की अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची तक्रार आल्यावर पोलिसांना तात्काळ कारवाई केली पाहिजे. किमान तिला बोलवून तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आतापर्यंत चाळीस मोर्चे निघाले.
त्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी केली आहे. आंतरजातीय विवाहांना सरकारचा विरोध नाही.
मात्र, गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्व षडयंत्राचा भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये असे विवाह केले जातात.
वर्ष-दीड वर्षात त्या मुलीला त्रास दिला जातो. अशा घटना मोठ्या प्रमाणावर बाहेर येताना दिसत आहेत,
असेंही फडणवीस यांनी नमूद केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काही राज्यात लव्ह जिहाद कायदे आहेत. केरळमध्ये लव्ह जिहाद हा विषय सर्वात आधी बाहेर आला होता.
हे नाव देखील केरळच्या सरकारने दिले आहे. ही कोणत्याही धर्माच्या विरोधातील कारवाई नाही.
पण अशा घटना घडतात, म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत,
त्याचा अभ्यास करून आपल्याकडे प्रभावी कायदा करण्याची गरज असेल,
तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये,
अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आवश्यकता असेल, तर राज्य सरकार नक्कीच तसा प्रयत्न करेल,
असे फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title :- Love Jihad Law | maharashtra assembly winter session devendra fadnavis on love jihaad shraddha walkar murder case

 

हे देखील वाचा :

Gram Panchayat Election Result 2022 | निवडणूक निकालानंतर झालेल्या दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यु; जळगाव येथील घटना…

Winter Session 2022 | ठाकरे गटाला आणखी एक धक्का! विधानसभेच्या तालिका सभाध्यक्षांच्या यादीतून केले बेदखल…

Winter Session -2022 | ‘कोयता गँग’मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा, पुणे शहर व परिसरातील ‘कोयता गँग’च्या गुंडांची दहशत रोखा; अजित पवारांची सभागृहात मागणी

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नावर जयंत पाटलांचे कर्नाटक सरकारला खडे बोल; म्हणाले…

 

Related Posts