IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | शिंदेंचा ठाकरेंना धक्का, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणे होणार

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Meeting | शिंदे सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Body Election) आणि महापालिका निवडणुका (Municipal Election) होणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात वाढवलेली वॉर्ड रचना (Ward-Composition) रद्द करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा निर्णय घेतला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे (Maharashtra Election 2022) सांगितले जातंय.

 

महाविकास आघाडी सरकारने वाढवलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती त्या प्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेने स्वत: च्या फायद्यासाठी वॉर्ड रचना केल्याचा आरोप करण्यात आला होता.
विशेष म्हणजे मुंबईतल्या वॉर्ड रचनांच्या मुद्यावरुन चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Congress Leader Milind Deora)
यांनी काल राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती.
त्यानंतर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting)
2017 च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणूक होणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

Web Title : –  Maharashtra Cabinet Meeting | bmc municipal elections will be held as per the 2017 ward structure eknath shinde group s big blow to uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | डी. पी. ओपिनियन देण्यासाठी 3.5 लाखांची मागितली लाच, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, या झाडाला नवे गुलाब येतील’, उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

Maharashtra Political Crisis | ‘अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही…’ शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा; सामंतांच्या कार हल्ल्यावरुन राजकारण तापलं !

 

Related Posts