IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; जाणून घ्या शिंदे-फडणवीस सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले 9 निर्णय

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion | these are the possible department of new ministers responsibility of 2 departments on devendra fadnavis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Cabinet Meeting | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत (Petrol-Diesel Rate Reduction) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) रद्द केलेला निर्णयही बदलण्यात आला आहे. 2018 मध्ये राज्यातील नगराध्यक्ष (Mayor) आणि ग्रामपंचायतीतून (Gram Panchayat) सरपंचाची (Sarpanch) निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. आज पुन्हा शिंदे-भाजप (BJP) सरकारनं हा निर्णय पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. (Shinde Fadnavis Government)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

1. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग)

2. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबविण्यात येणार. (नगर विकास विभाग)

3. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार (नगर विकास विभाग)

4. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार (नगर विकास विभाग)

5. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

6. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

7. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

8. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा. (पणन विभाग)

9. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | Mayor, Sarpanch will be elected directly from the people; Know the 9 decisions taken by the Shinde-Fadnavis government in today’s cabinet meeting

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | आईने मुलं आणि करिअरमध्ये कशाची निवड करावी; मुंबई हायकोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

CM Eknath Shinde | पेट्रोल-डिझेलवरील दरात मोठी कपात, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

Pune Crime | भाडे पळविण्यावरुन रुग्णवाहिका चालकांमध्ये राडा; चहाचे भांडे, प्लॅस्टिक कॅरेटने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Related Posts