IMPIMP

Mumbai High Court | आईने मुलं आणि करिअरमध्ये कशाची निवड करावी; मुंबई हायकोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

by nagesh
Mumbai High Court | Bombay Mumbai high court order to admit student with learning disability in veterinary science and animal husbandry degree course mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court | मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High Court) एका प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण निर्वाळा करण्यात आला आहे. महिलेला मुलं अथवा करिअर या दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगू शकत नाही. असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

एका याचिकेमध्ये आईने तिच्या 9 वर्षांच्या मुलीसह पोलंडमधील क्राको येथे जाण्याची परवानगी मागितली होती. परंतु, पतीने याचिकेला विरोध केला होता. मुलीला वडिलांपासून तोडण्याचा हेतू असल्याचे न्यायालयात म्हटलं होतं. यावेळी कौटुंबिक कोर्टानं आईला मुलीसोबत पोलंडला (Poland) जाण्यास बंदी घातली होती. तेव्हा महिलेने हायकोर्टाचा (Mumbai High Court) दरवाजा ठोठावला. त्यानंतर मुंबई हायकोर्टातील भारती डांगरे (Judge Bharti Dangre) यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुलीला आपल्यापासून दूर नेले गेले तर पत्नीचे तोंड पुन्हा पाहणार नाही. पिता – मुलीचे नाते तोडणे हाच उद्देश असल्याचा आरोप पतीकडून करण्यात आला आहे. यावेळी पोलंड शेजारी असलेल्या युक्रेन आणि रशियामुळे सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा हवालाही दिला होता.

 

आजपर्यंत मुलीचा ताबा आईकडे होता. तिने एकटीने मुलीचे संगोपन केले आहे.
त्याचबरोबर, मुलीचे वय लक्षात घेता तिला आईची सोबत असणे आवश्यक आहे.
आईला नोकरी करण्यापासून रोखावे, असं न्यायालयाचे मत नाही. वडील आणि दोघांमधील नात्यात समतोल राखला पाहिजे.
मुलीच्या भविष्याचाही विचार केला पाहिजे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

दरम्यान, न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ज्यामध्ये आईला तिचे मुलं आणि करिअर यापैकी एक निवडण्यास सांगितले जाऊ शकत नाही, असे आदेश दिले आहेत.
ही महिला पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत असून तिच्या कंपनीने पोलंडमध्ये प्रोजेक्ट ऑफर केला होता.
त्यानंतर कोर्टाने सांगितल्यानंतर महिला पोलंडला जाऊ शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Mumbai High Court | cant force mother to choose between kid and career mumbai bombay high court

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | पेट्रोल-डिझेलवरील दरात मोठी कपात, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

Pune Crime | भाडे पळविण्यावरुन रुग्णवाहिका चालकांमध्ये राडा; चहाचे भांडे, प्लॅस्टिक कॅरेटने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | खाद्य तेलाच्या व्यवहारात 8.5 कोटींचा अपहार; मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts