IMPIMP

लसीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘लस घेताना…’

by pranjalishirish
maharashtra-cm-uddhav-thackeray-first-comment-after-taking-a-covid-vaccin

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना लशीचा (Coronavirus Vaccine) पहिला डोस घेतला. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्यांनी लस घेतली. कोरोना लसीसंदर्भात संभ्रम दूर व्हावा आणि लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं सीएम ठाकरेंनी Uddhav Thackeray लस घेतली असं सांगितलं जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेही उपस्थित होते. दरम्यान, लस घेतल्यानंतर ठाकरेंनी Uddhav Thackeray यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील जनतेलाही त्यांनी लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

लस घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, लसीबद्दल मनात भीती आणि संभ्रम ठेवू नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या, असं आवाहन त्यांनी केलं. कोरोनाची लस इतक्या छान पद्धतीनं दिली जात आहे की, लस घेताना कळतही नाही. सर्व माता भगिणींनी आणि जे कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता कोरोनाची लस घ्यावी, असं आवाहन मी राज्यातील जनतेला करतो असंही ते म्हणाले.

सीएम ठाकरेंनी लस घेतली तेव्हा डॉ. तात्याराव लहाने हेदेखील उपस्थित होते. ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी कोरोना लस घेतली. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts